Maharashtra Rainfall: कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी

Heavy Rain Update: गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकण आणि घाटमाथ्याने पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. रायगडमधील चौक येथे तब्बल २२३ मिमी पावसाची नोंद झाली असून घाटमाथ्यावर व कोकणात नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढते आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: मागील दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा कोकण, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला आहे. घाटमाथ्यावर पावसाची संततधार कायम आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत रायगडमधील चौक मंडलात सर्वाधिक २२३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर नाशिकमधील दारणा, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, वडिवळे, खडकवासलासह महाकोशी, नायगाव देगाव, दिवळे, आडले, मळवंडी ठुले, जाधववाडी तलाव भरल्याने ओढे, नाले व नद्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने दुथडी भरून वाहत आहे.

कोकणात पुन्हा जोरदार

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेल्या पावसाचा जोर गुरुवारी (ता. १९) पहाटेपासून पुन्हा वाढला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. या भागात १२ जून ते १६ जूनपर्यंत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्‍ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. पावसाच्या जोरदार सरी पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांश भागात सुरू आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. तीन-चार दिवस पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणीपातळीत घट झाली होती. परंतु आता त्यामध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

Heavy Rain
Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

घाटमाथ्यावर जोर

कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. डुंगरवाडी घाटमाथ्यावर २२३ मिलिमीटर पाऊस झाला. तर ताम्हिणी घाटमाथ्यावर २३०, शिरगाव २०५, भिवपुरी २२०, आंबोणे २१८, दावडी २१०, खांड १८९, खोपोली १८५, भिरा १५४, लोणावळा १८७, वळवण १२२ मिलिमीटर पाऊस झाला. तर इतर घाटमाथ्यावर दमदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

पुणे, नगर, नाशिकमध्ये दमदार पाऊस

गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा नगर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केल्यानंतर गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे सर्वाधिक १९५ तर येथे लोणावळा येथे १६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे खडकवासला धरणासह अनेक तलावातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. कोयनानगर येथे १३३ मिलिमीटर, नवजाला १५८ मिलिमीटर आणि महाबळेश्‍वरला १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कमी होता, मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. रात्री पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे जलाशयात प्रतिसेकंद २७ हजार ८१२ क्युसेक पाण्याची आवक होत असून, गेल्या २४ तासांत २.४ टीएमसी पाण्याची भर पडली आहे. अहिल्यानगर जिल्‍ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात फारसा पाऊस नव्हता. दोन दिवसांपासून या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आता या पावसामुळे भात रोपे टाकण्याला सुरुवात होणार आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत रतनवाडी येथे १६९, घाटघरला १५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Heavy Rain
Maharashtra Monsoon 2025: जोरदार पावसाचा राज्यात अंदाज; विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस येलो अलर्ट

मराठवाडा, विदर्भात ढगाळ हवामान

मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग व मराठवाडा, खानदेश व विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. या भागात पाऊस नसल्याने खरिपाची कामे वेगात सुरू आहे. काही ठिकाणी अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना चांगलाच आधार मिळत आहे. परंतु अनेक ठिकाणी ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून पाणी पातळी घटली आहे.

गुरुवारी (ता. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत अतिवृष्टी झालेली मंडले : (स्रोत- कृषी विभाग)


कोकण : ठाणे ७९, बलकुंभ, मुंब्रा, भिवंडी, खरबाव ६८, भाईंदर, खेर्डी ६५, दहीसर, बेलापूर ७७, कल्याण, तितवाला, मरळ, उल्हासनगर, बोरलीपंचटन, तळवली ६७, मुरबाड १४९, नयाहडी १५७, धसई, सरळगाव, शिवले, ओवळे, कर्नाळा, नेरे, नागाव १३७, अंगाव, दिघशी ९०, पडघा, नडगाव, राहूर ८०, शहापूर, खर्डी, कासारा ८६, कोंडवी, अंबरनाथ, कुंभारली १०५, बदलापूर, गोरेगाव, डहाणू, मालयान, कसा १०६, अलिबाग, सरळ, नागाव १३६, चरी १९७, चौल, बवरली ९९, रामराज १५९,

पोयंजे, मोराबे १४८, तळोजे ७७, कर्जत १७४, नेरळ १४९, कडाव, कळंब, काशेले, चिंचवली, पाथ्रज १०७, चौकट २२३, वावोळी १७८,खोपोली १५५, वासंबे १४८, उरण १९८, जसई ११४, पाली, आटोने १२१, जांभुळपाडा १८०, पेण १३२, हमरापूर १९८, वाशी १९७, कामर्ली १७१, महाड, तुडील १०१, बिरवडी, खारवली, जव्हार, साखर, मोखाडा १११, करंजवाडी, नाटे, घोसाळे, गोरगाव, लोणेरे, तळा ९८, मांगरून, तलासरी ८१, मानगाव, निझामपूर ९३, इंदापूर ६८, रोहा १३२, नागठाणे १३९, कोलड १५५, पोलादपूर, वाकण १०४, मुरूड, नंदगाव, दाभोळ ७४, श्रीवर्धन, वाळवटी, मनवर १२९, म्हसळा ८७,

खामगाव ११२, सोनसाडे १५५, दापोली १०८, आंजर्ला, वसई, वेळवी ७८, वाकवली, खेड ९०, पालघड १२५, आंबवली, कुळवंडी ९२, भरणे, दाभीळ, धामनंद ६५, भांबेड, मंडणगड ११०, म्हाप्रळ, देव्हरे ९४, तरवल, फुनगुस, माभळे ८२, देवळे ७२, देवरूख, तुळसानी ६५, पुनस १०२, वाडा, कुडूस, कोणे, कांचड १९९, साईवन, तळवाडा ९६, चिंचणी ११९, पालघर, भोईसर, सफळा, आगारवाडी १३२, तारापूर १२३, खोडाळा ९७, झरी ६६, विक्रमगड १४३,

मध्य महाराष्ट्र : मुल्हेर ९९, किकवरी ७८, उंबरठाना १०९, बाऱ्हे, धारगाव ९७, मानखेड १२८, सुरगाना, खोकरी १०९, दिंडोरी ७७, मोहाडी, वेल्हा ८१, नानशी १२३, लाखमपूर ७७, इगतपुरी, घोटी, आष्टे ७५, वाडीवऱ्हे ७४, ताकेत ७३, पेठ ११८, जोगमोडी, कोहोर, करंजाळी १२३, त्र्यंबकेश्वर, वेळुंजे, ताकवे, केळघर, करहर, कार्ला, खडकाळा १११, थानापाडा १२८, साक्री, कसारे ७३, नंदुरबार ९१, धानोरा १०७, साकीरवाडी, कोथरूड, पौड, घोटावडे, पिरंगुट, कासार आंबोली, सावरगाव, डिंगोरे ६६, चिंचवड ८२, माले, मुठे, काळे, कोळवण, शिवणे ७२, माण, परिंदवाडी ६९, निगुडघर ७१, लोणावळा, कुसगाव १६०, ताकवे, वाडेश्वर ७७, पानशेत, विंझर ६८, राजूर, आपटाळे ८८, आंबेगाव १९४, बोमणोली ९२, पसरणी, महाबळेश्वर, कोतूळ, पाचगणी ६५, तापोळा, लामज ९२.

पाऊस दृष्टिक्षेपात
- राज्यातील साडेतीनशेहून अधिक मंडलांत अतिवृष्टी
- कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढला
- पश्चिम महाराष्ट्रात २१५ मंडळात अतिवृष्टी
- कोकणात १४७ मंडळात अतिवृष्टी
- घाट माथ्यावर जोरदार पाऊस
- नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com