Monsoon 2024 : कोकण, मराठवाड्यात तुरळक सरी

Maharashtra Rain Update : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत.
Monsoon 2024
Monsoon 2024Agrowon
Published on
Updated on

Monsoon News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस आहे. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळत आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला येथे ६३ मिलिमीटर, तर सावंतवाडी येथे ६१.१ मिलिमीटर पाऊस पडला. तर कुडाळ ३८.३, वैभववाडी ४९.९, दोडामार्ग ३६.८ मिलिमीटर पाऊस पडला.

Monsoon 2024
Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर कधीपासून ? माॅन्सूनचा प्रवास कशामुळे थबकला? आठवड्याचा पावसाचा अंदाज काय?

या पावसामुळे भात रोपवाटिकेतील रोपे उगवून वर आली आहे. रोपांची वाढ चांगली आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे २२.४ मिलिमीटर पाऊस पडला. उर्वरित भागात कडक ऊन पडले होते. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या वेगात सुरू झाल्या आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. नांदेडमधील मुखेड येथे ४६ मिलिमीटर, परभणीतील सोनपेठ येथे ४३.४ मिलिमीटर, तर परभणी ३४.५, गंगाखेड ३२.८, पाथरी ३४.७ मिलिमीटर पाऊस पडला. बीडमधील माजलगाव येथे ३७.९ मिलिमीटर, परळीत ३६.२ मिलिमीटर पाऊस पडला.

Monsoon 2024
Rain Update : नगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ८२ टक्के पाऊस

इतर भागात ऊन असल्याने पेरण्यासाठी शेतात शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. विदर्भात बुलडाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक सरी बरसल्या. वाशीमधील मालेगाव येथे ३८.६ मिलिमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असून तुरळक सरी कोसळत आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया भागांत ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका वाढत असून कमाल तापमानात वाढ होत आहे.

सोमवारी दिवसभरातील पाऊस...

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर पाऊस नाही.

धाराशिव जिल्ह्यात उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांत पाऊस.

धाराशिव जिल्ह्यात सारोळा भागात पाऊस.

नागपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी.

अकोल्यात उघडीप, सांगलीत ढगाळ वातावरण.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com