Parbhani News : परभणी-हिंगोली जिल्ह्यांतील ६७ मंडलांत गुरुवारी (ता. २७) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी अनेक मंडलांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे खरिपाची पेरणी रखडली आहे.
पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे उगवू लागलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागांत बियाण्याची उगवण होत नसल्याने दुबार पेरणीचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
परभणी जिल्ह्यातील ३९ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस झाला. परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील १३ मंडलांत पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.५ मिमी, तर यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी १५८.४ मिमी पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडलांत अत्यंत हलका ते मध्यम पाऊस झाला. कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यांतील २ मंडलात पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ६.७ मिमी, तर यंदा १ जूनपासून आजवर एकूण सरासरी १२६.६ मिमी पाऊस झाला.
मंडलनिहाय पाऊस (५ मिमीपुढे)
परभणी जिल्हा : पेडगाव १४.८, सिंगणापूर १८, जिंतूर १४, सावंगी म्हाळसा २१.८, बामणी १२.८, बोरी ५.३, आडगाव ४३.३, वाघी धानोरा ७.८, दूधगाव १८.५, देऊळगाव गात ५.५, वालूर ६.३, चिकलठाणा १२, मोरेगाव ७.८, केकरजवळा १५.३, कोल्हा ९.५, ताडबोरगाव ८.५, पाथरी ३२७.५, बाभळगाव १३.३, हादगाव १८.८, कासापुरी १६, पूर्णा १२.५, ताडकळस २९, लिमला ९.३.
हिंगोली जिल्हा : डिग्रस कऱ्हाळे २६.५, अंबा २०.५, हयातनगर १४.५, टेंभुर्णी ९.५, औंढा नागनाथ १०.८, साळणा ९.८, जवळा बाजार १९, साखरा,१२.८, हत्ता ४४.८.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.