Farmers Protest : पंजाब-हरियाणातील रेल्वे रोको आंदोलन स्थगित

Rail Roko Andolan : संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने छेडलेले मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Pune News : पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूसह इतर ठिकाणी गेल्या ३४ दिवसापासून सुरू असणारे रेल्वे रोको आंदोलन सोमवारी (ता. २०) स्थगित करण्यात आले. हे आंदोलन संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने १६ एप्रिल २०२४ ला सुरू केले होते. मात्र आता ते ३४ दिवसानंतर १९ मे पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय शेतकरी नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. तसेच रेल्वे रोको आंदोलन फक्त स्थगित केले जात असून मुळ आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच आपल्या मागण्यांसह तीन शेतकरी नेत्यांच्या सुटकेसाठीनव्या रणनितीनुसार भाजप नेत्यांच्या घर आणि कार्यालयांना घेराव घातला जाईल, असेही शेतकरी नेते सुरजित सिंग फूल यांनी म्हटले आहे.

चंदीगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत काका सिंग कोत्रा, सुरजित फूल, सर्वन सिंग पंधेर, बलदेव सिंग सिरसा, सुखजित सिंग, दिलबाग सिंग, लखविंदर सिंग औलख, गुरिंदर भंगू, अभिमन्यू कोहर, मलकित सिंग आदी शेतकरी नेते उपस्थित होते.

Farmers Protest
Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

रेल्वे प्रवाशांना दिलासा

शंभूसह इतर ठिकाणी गेल्या ३४ दिवसांपासून शेतकरी एमएसपी हमीसह १२ मागण्यांसाठी आंदोलन करत होते. तसेच शंभू, खनौरी आणि रतनपुरा बॉर्डरवरही आंदोलन केले जात आहे. याला २२ मे रोजी १०० दिवस पूर्ण होतील. यादरम्यान मुख्य मागण्यांसह तीन शेतकरी नेत्यांच्या सुटकेसाठी रेल्वे रोको आंदोलन सुरू गेले. यामुळे अनेक रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला होता. अनेक गाड्यांच्या मार्गातही बदल करावे लागले होते. तर प्रवाशांच्या तिकीटाचे पैसे रेल्वे प्रशासनाला परत कारावे लागले होते. पण आता आंदोलक शेतकरी नेत्यांनी घेतलेल्या स्थगितीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

भाजप नेत्यांच्या निवासस्थानांना 'घेराव'

यावेळी फूल यांनी सांगितले की, आंदोलक शेतकऱ्यांनी पुकारलेले रेल्वे रोको आंदोलन हे पुढे ढकलण्यात आले आहे. पण तीन शेतकऱ्यांच्या सुटकेसाठी आम्ही सरकारवर दबाव आणू. यासाठी येत्या काही दिवसांत पंजाब आणि हरियाणामधील भाजप नेत्यांच्या निवासस्थानांना 'घेराव' घातला जाईल. तसेच पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमादरम्यान शेतकरी मोठ्या संख्येने जाऊन त्यांना प्रश्न विचारतील. २ जूनपर्यंत सर्व शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह पोहोचून मोर्चे बळकट करावे, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे.

सरकारवर कोणताच परिणाम नाही

पंजाबमधील शंभू रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी रेल्वे रोको आंदोलन केले जात होते. यामुळे शेकडो रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या होत्या. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र याचा केंद्र सरकार असो किंवा हरियाणा राज्य सरकार यांच्या कोणताही परिणाम झाला नाही. अटकेत असलेल्या तीनही शेतकऱ्यांना अद्याप जेलमध्येच ठेवण्यात आले आहे. यामुळे संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने वेगळा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना सध्या सुरू असणारे रेल्वे रोको आंदोलन स्थिगीत केले गेले आहे. मात्र शंभू, खनौरी आणि रतनपुरा बॉर्डरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.

Farmers Protest
Rakesh Tikait : राकेश टिकैत यांची १६ फेब्रुवारीला भारत बंदची घोषणा

अनेक शेतकरी नजरकैद

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना शेतकऱ्यांकडून अडथळा आणला जाऊ शकतो यावरून पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवले आहे. हा आरोप शेतकरी नेत्यांनी चंदीगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शेतकरीच शिकवतील धडा

शंभू, खनौरी आणि रतनपुरा बॉर्डरवर एमएसपी हमीसह १२ मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलनास २२ मे रोजी १०० दिवस होतील. यावरून शंभू, दातेसिंग वाला-खनौरी, डबवली आणि रतनपुरा हद्दीत शेतकरी आंदोलनाला बळ देण्यासाठी हजारो शेतकरी एकत्र येणार आहेत. तसेच केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निषेध नोंदवला जाईल अशीही माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे.

किसान महापंचायतचे आयोजन

तसेच शेतकरी नेत्यांनी सांगितले की, १९ मे रोजी "किसान इंसाफ यात्रा" च्या समारोपाच्या निमित्ताने कैथलच्या पै गावात किसान महापंचायतचे आयोजन करण्यात आले. यावरही हरियाणा पोलिसांनी आक्षेप घेत अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र शेतकरी झुकले नाहीत. विरोध डावलून हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महापंचायतच पार पाडली.

शेतकरीच धडा शिकवणार

पण आता १० वर्षात शेतकरी, मजूर, बेरोजगारांवर अत्याचार करणाऱ्या सत्तेतील लोकांना धडा शिवकण्याची वेळ आली आहे. तर आम्ही शेतकरी एकत्र येऊन या लोकांना धडा शिकवू, असा इशारा ही शेतकरी नेत्यांनी यावेळी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com