
Raigad News : रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र व २८८ उपकेंद्राच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यात येते. मात्र, या केंद्रातील १ हजार ३३३ मंजूर पदांपैकी ५११ पदे रिक्त असल्याने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, वाडी-वस्तींवरील रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ५३ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित गावच्या जवळपासच्या गावातील रुग्णांच्या लसीकरणासारख्या तसेच इतर काही आरोग्याच्या सोयींसाठी आरोग्य २८८ उपकेंद्रेही सुरू आहेत.
सेवांवर परिणाम
स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरिता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे, हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण, सहा रोगांवर लसीकरण करणे, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे अशा सेवा पुरविल्या जातात.
शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे, संतती नियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे, आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे, रोगांचे निदान, उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम, आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे.
सध्याची परिस्थिती
प्राथमिक आरोग्य केंद्र - ५३, उपकेंद्र - २८८
मंजूर पदे -१ हजार ३३३
पदे रिक्त - ५११
वर्ग १ व वर्ग २ वैद्यकीय अधिकारी ८ पदे
आरोग्य पर्यवेक्षक - ४
औषध निर्माण अधिकारी - ६
आरोग्य सहाय्यक पुरुष - १
आरोग्य सहाय्यक महिला- ३०
आरोग्य सेवक पुरुष - ६८
आरोग्य सेवक महिला - ३२१
प्रशिक्षित ताई - २
सफाई कामगार - ५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.