
थोडक्यात माहिती :
जळगाव जिल्ह्यातील सुमारे ३०० आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची कमतरता आहे,
अनेक अधिकारी दीर्घ रजेत किंवा नियुक्तीविना असल्याने, गावांतील रुग्ण खासगी उपचारांकडे वळत आहेत.
हिवताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होत असून, सरकारी यंत्रणा कागदोपत्रीच कार्यरत असल्याचे चित्र आहे.
Jalgaon News : जिल्ह्यात ११५३ गावे आहेत. यासाठी सुमारे ३०० प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. पण यातील सेवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव किंवा अपुरी संख्या आणि अन्य बाबींच्या अडचणी आहेत. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांत एमबीबीएस डॉक्टर नियुक्तीची अट आहे. यात अनेक अधिकारी जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्यास उत्सुक नसल्याने अनेक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी असल्याचे दिसत आहे.
अनेक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. परंतु अधिकारी स्पर्धा परीक्षा व अन्य कारणांसाठी दीर्घ रजेवरही आहेत. अनेक वर्षे हाच प्रकार सुरू आहे. तसेच काही केंद्रांत वैद्यकीय अधिकारीपद रिक्त आहे. शिवाय अन्य पदेही रिक्त असतानाच अनेक कर्मचारी बदली करून घेतात. यामुळे अडचणी कायम आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची यंत्रणा असते. परंतु ती कमकुवत झाल्याची स्थिती आहे. जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे. सदस्य, पदाधिकारी नसल्याने यंत्रणा हावी झाल्याची स्थिती आहे. तसेच आरोग्य केंद्र रुग्णालये वाऱ्यावर असून, परिसरातील याचा फटका रुग्णसेवेला बसला आहे.
हिवतार, मलेरिया, डेंग्यू, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास वाढत आहे. अनेक ग्रामीण रुग्णालयांत ३० खाटांची सोय आहे. आदिवासी परिसरात त्यांचे महत्त्व आहे. या भागातील नागरिक वैद्यकीय तपासणीसाठी येत असतात. शासकीय आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार होत नसल्याने हिवताप, मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांना खासगी वैद्यकीय सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून गावांत सर्वेक्षणही केले जात नाही.
फक्त टेबलावर बसून अहवाल, सर्वेक्षण माहिती तयार केली जाते, असाही आरोप ग्रामस्थ करतात. यामुळे ग्रामस्थांना खासगी आरोग्य सेवेचा आधार घेऊन मोठा खर्च करावा लागत आहे. सध्या पाऊस कमी आहे. यात गावोगावी डासांची समस्या आहे. दूषित पाणीही येते. यामुळे आजार पाय पसरत आहेत.
रुग्णांसमोर अडचणी
एका ग्रामीण रुग्णालयात रोज अडीचशे, तीनशे ओपीडी होतात. परंतु अनेक रुग्णालयात व आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. उपस्थित कर्मचारी, परिचारिका त्यांच्या पातळीवर ड्रेसिंग, प्रथमोपचार, टी.टी. इंजेक्शन अशा प्रकारचे प्राथमिक उपचार करतात. पण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात औषधी रुग्णांना मिळत नाही. गावांत मलेरिया, डेंग्यू, सर्दी, खोकल्याची साथ सुरू आहे. अनेक केंद्रांत चांगले डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर नसल्यामुळे औषधी देत नाहीत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न 1: जळगाव जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांत डॉक्टर नसल्याचे मुख्य कारण काय आहे?
उत्तर: जिल्हा परिषद सेवेत येण्याची अनिच्छा आणि दीर्घ रजेवर असलेले अधिकारी हे मुख्य कारण आहे.
प्रश्न 2: याचा परिणाम ग्रामीण भागातील रुग्णांवर कसा होत आहे?
उत्तर: सरकारी आरोग्य सेवा अपुरी असल्याने रुग्णांना खासगी उपचारावर अवलंबून राहावे लागत आहे.
प्रश्न 3: साथीचे आजार वाढण्यामागचे कारण काय आहे?
उत्तर: कमी पावसामुळे डासांची समस्या आणि दूषित पाणी हे मुख्य कारण आहेत.
प्रश्न 4: आरोग्य केंद्रांची तपासणी व सर्वेक्षण योग्य प्रकारे होते का?
उत्तर: बहुतांश वेळा अहवाल टेबलावरच तयार होतो, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.