Paddy Plantation : भातलागवडीखालील क्षेत्रात घट

Paddy Farming : जिल्ह्यात प्रामुख्याने भात, नाचणी ही पिके घेतली जातात. १० वर्षांपूर्वी भातलागवडीखालील क्षेत्र एक लाख ३० हजार हेक्टर एवढे होते.
Paddy Plantation
Paddy Plantation Agrowon
Published on
Updated on

Raigad News : जिल्ह्यात भातपिकाखालील क्षेत्र दहा वर्षांत झपाट्याने कमी होत आहे. १० वर्षांत तब्बल ४६ हजार हेक्टर भातशेतीचे क्षेत्र घटले असून यंदा त्‍यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने भात, नाचणी ही पिके घेतली जातात.

१० वर्षांपूर्वी भातलागवडीखालील क्षेत्र एक लाख ३० हजार हेक्टर एवढे होते. या वर्षी खरीप हंगामात केवळ ८१ हजार ३३५ हेक्टर एवढे क्षेत्र असल्याचे खरीप हंगाम बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मजुरांची कमतरता, रखडलेले सिंचन प्रकल्प, रस्‍त्‍यांसाठी संपादित केलेल्या जमिनी तसेच प्रत्यक्ष सिंचनावर आधारित पीकवाढीकडे सरकारचे झालेले दुर्लक्ष अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे.

Paddy Plantation
Paddy Harvesting : उन्हाळी भातशेती कापणीला वेग

त्यातच लहरी हवामानाचा फटका, पूर, प्रदूषण, भरतीचा फटका यामुळे शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. शहरानजीक असलेल्या ग्रामीण भागातील शेतजमिनींना बांधकाम उद्योगामुळे सोन्याचा भाव मिळाल्याने येथे टोलेजंग इमारती उभ्या राहतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र तसेच उरण परिसरात बंदरे विकसित झाली. यामुळे शेतीपेक्षा जमीन व्यवहाराची उलाढाल वाढली आहे.

Paddy Plantation
Paddy Nursery Management : नियोजन भात रोपवाटिकेचे...

रायगडची ओळख नष्ट होणार

भूगोलाच्या पुस्तकात रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी असलेली ओळख आता इतिहासजमा होण्याची भीती निर्माण झाली आहे. महाडचे प्रसिद्ध पांढरे वाल, खाडीपट्ट्यात होणारे वाल, पावटा शेती जल प्रदूषणामुळे बंद झाली.

पनवेल तालुक्यातून तूर लागवड; पनवेल, मुरूड आणि उरण तालुक्यातील मूग लागवड; अलिबाग, पेण, मुरूड येथील उडीद लागवड आता जवळपास हद्दपार झाली आहे. जिल्ह्यात आता गुजरातचा पावटा, चवळी, परराज्यातील मटकी आणि मूग दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com