Watermelon Export : रायगडचे कलिंगड आता दुबईच्या बाजारपेठेत

Watermelon Cultivation : या प्रगतशील शेतकऱ्याने पिकवलेली कलिंगडे आता परदेशात निघाली आहेत. रोहनने साधारण २० एकर जागेत आठ प्रकारच्‍या कलिंगडांचे पीक घेतले आहे.
Watermelon Export : रायगडचे कलिंगड आता दुबईच्या बाजारपेठेत
Published on
Updated on

Raigad News : नोकरीच्या मागे न लागता रायगडमधील तरुणांनी कलिंगडाचे उत्‍पादन घेत उन्नती साधली आहे. कुंडलिका, काळ नदीच्या पाण्यावर तयार झालेल्या कलिंगडांमुळे रायगडला कलिंगडाची निर्यात करणारा जिल्हा म्हणून ओळख मिळत आहे.

रोहा तालुक्यातील बाहे येथील रूपाली देवकर या तरुणीने भाडेतत्त्वावर घेतलेल्‍या आठ एकर घेतलेल्या जागेत ४० टन कलिंगडाचे पीक घेतले, तर गोरेगावमधील रोहन साळवी या प्रगतशील शेतकऱ्याने पिकवलेली कलिंगडे आता परदेशात निघाली आहेत.

Watermelon Export : रायगडचे कलिंगड आता दुबईच्या बाजारपेठेत
Watermelon Cultivation : आमराईत कलिंगडाचे आंतरपीक

रोहनने साधारण २० एकर जागेत आठ प्रकारच्‍या कलिंगडांचे पीक घेतले आहे. यातील सुप्रीत जातीच्‍या कलिंगडांना दुबईत मोठी मागणी आहे. रोहनच्‍या शेतावरून पहिल्‍या टप्‍प्‍यात जवळपास ४० टन मालाची उचल झाली आहे.

Watermelon Export : रायगडचे कलिंगड आता दुबईच्या बाजारपेठेत
Watermelon Arrival: खानदेशात कलिंगड आवक कमी असूनही दर अस्थिर

तब्‍बल ४० टन कलिंगडांची उचल

आम्‍ही ४० टन मालाची उचल केली आहे. सुप्रीत जातीच्‍या कलिंगडांना दुबईमध्‍ये मागणी आहे. एपीएमसीतून ही कलिंगडे कंटेनरमधून दुबईला पाठवली जातील. थेट बांधावर खरेदी होत असल्‍याने शेतकरीही समाधानी असल्‍याचे जयदेव वावेकर या व्यापाऱ्याने सांगितले.

नोकरीच्‍या मागे न लागता जर शेतीत काम केले, तर नोकरीपेक्षा चांगले उत्‍पन्‍न मिळते. याशिवाय आपला आत्‍मसन्‍मान उंचवण्याचे काम शेतीमधूनच होऊ शकते. सरकारच्या विविध योजना आहेत; मात्र तरुण या योजनांची माहितीही घेत नाहीत. याबाबत जनजागृती आवश्‍यक आहे.
- रुपाली दिवेकर, शेतकरी, बाहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com