Raigad Rain Update : रायगडला पावसाने झोडपले

Rain News : गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. कधी दमदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते.
Raigad Rain
Raigad RainAgrowon
Published on
Updated on

Alibaug Rain Update : गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. कधी दमदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते. या पावसात अनेकांच्या घरांची पडझड झाली असून महाड, पेणमध्ये दरड कोसळल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून पावसामुळे वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

जिल्ह्यामध्ये २४ जूनपासून आत्तापर्यंत १६७ मिमि. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून त्याचा फटका किनाऱ्यालगतच्या गावांना बसला आहे.

यात पेणमधील खाडीलगत असलेली सागरीवाडी, अष्टविनायकवाडी, विठठलवाडीतील ४७ कुटूंबांना तर पेणमधील दूरशेत येथील दरडग्रस्त गावातील सहा कुटुंबे, मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील दरडग्रस्त गावातील नऊ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

याचबरोबर आठ तालुक्यातील ४१ घरांचे नुकसान झाले असून अलिबागमधील पाच, म्हसळ्यातील २०, पनवेलमधील दोन, तळा व सुधागड मधील प्रत्येकी एक, उरणमधील दोन, महाडमधील तीन, रोहामधील सात घरांचे नुकसान झाले असून माणगाव तसेच म्हसळ्यातही वित्तहानीची नोंद आहे.

Raigad Rain
Rain Forecast : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

नद्या इशारा पातळीवर

रोहा तालुक्यातील कुंडलिका, अंबा, महाडमधील सावित्री, पनवेलमधील पाताळगंगा, गाढी तर कर्जतमधील उल्हास या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. या नद्यांमध्ये सध्या पावसाचे पाणी वाढू लागले आहे. कुंडलिका नदीत सध्या २२.४० मीटर , पाताळगंगा नदीत १८.७० मीटर इतका जलसाठा असून इशारा पातळीच्या मार्गावर आहे.

तालुका- नदी - पातळी- धोका पातळी

रोहा कुंडलिका - २२ .४०- २३.९५

रोहा - अंबा - ४.७० - ९.००

महाड - सावित्री- ३.६० - ६.५०

पनवेल- पाताळगंगा- १८.७० - २१.५२

कर्जत - उल्हास - ४४.१०- ४८.७७

पनवेल - गाढी- २.३० - ६.५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com