Crop Insurance : रोह्यात पीकविमा रकमेची प्रतीक्षा

Fruit Crop Insurance Update : रोहा तालुक्यातील फळ बागायतदार, शेतकरी वर्गाला अद्याप विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे हजारो हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले. या शेतकरी वर्गाला फळपिक विमा मिळण्याची आशा होती. मात्र दिवाळी संपली तरी शेतकरी वर्गाला ही भरपाई मिळाली नसल्याने त्यांच्यात कमालीची नाराजी पसरली आहे. रोहा तालुक्यातील फळ बागायतदार, शेतकरी वर्गाला अद्याप विम्याच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर आंबापिकांची लागवड केली जाते. तर बहुतांश शेतकरी वर्गाची रोजीरोटीही यावरच अवलंबून असते. परंतु अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे हजारो हेक्टर आंबापिकांचे नुकसान झाले आहे. जे शेतकरी फळबाग आणि आंबा पिकांवर अवलंबून आहे,

Crop Insurance
Fruit Crop Insurance : फळपीक विम्याच्या परताव्याबाबत संभ्रम

त्यांच्यावर आर्थिक बेकारीची कुऱ्हाडच कोसळली आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारकडून फळपिक विमा भरपाईची रक्कम अलिबाग, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, पेण आदी तालुक्यांतील आंबापीक बागायतदारांना पीक विम्याची भरपाई मिळाली आहे; मात्र रोहा तालुक्यातील शेतकरी भरपाईपासून अद्याप वंचित राहिल्याने कमालीची नाराजी पसरली आहे. ही भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयातच विमा कंपन्याच्या अधिकाऱ्यांना डांबले
शेतकऱ्यांना विम्याचे पैसे वेळेवर मिळणे अपेक्षित असताना त्यांना अद्याप ते मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सरकारने याकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी.
रामकृष्ण मरवडे, शेतकरी
रोहा तालुक्यात नागोठणे, मेढा, कोलाड, आंबेवाडी, रोहा, घोसाळे, चणेरा असे सात विभाग आहेत. या सर्व विभागांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होत असते. यावर्षी कंपनीकडून अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. आठवड्याभरात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
महादेव करे, रोहा तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com