Rahul Gandhi : 'पंतप्रधान मोदी यांची ५६ इंचाची छाती नाही, ते फक्त मुखवटा आहेत' : राहुल गांधी यांची टीका

Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप होणार झाला. तर यासभेला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

Pune News : काँग्रसेचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ६३ दिवसांनंतर समारोप रविवार (ता. १७) मुंबईत झाला. यावेळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या समारोप सभेत राहुल गांधी यांनी, नरेंद्र मोदींची भ्रष्टाचाराची मक्तेदारी असून इलेक्टोरल बाँड्सची पद्धत सुरू झाली. इथे रस्त्यावरून खंडणी मागितली जाते. जे (भाजप) सरकार करत आहे. कंपनीला कंत्राट मिळते, त्यानंतर ते थेट इलेक्टोरल बाँड्स खरेदी होतात. कंपनी कोणताही नफा कमवत नाही. मात्र पैसे भाजपला देतात. महाराष्ट्रात सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. सीबीआय ईडीची चौकशी झाली की लगेच अदानींना विमानतळ दिले जाते. छोटे लघु-मध्यम उद्योग आज नष्ट केले जात आहेत, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रियंका गांधी वाड्रा, अभिनेत्री स्वरा भास्कर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, फारूख अब्दुल्ला यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी प्रमुख नेत्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : 'शेतकरी मजुराला काही समजत नाही, अशी भाजपची विचारसरणी'; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

राजाचा आत्मा हा ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स

पुढे राहुल गांधी म्हणाले, आम्हाला गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर आणि आता मनिपूर ते मुंबई ही यात्रा फक्त बेरोजगारी, हिंसाचार, द्वेष, महागाई, शेतकरी, अग्निवीर या प्रश्नांसाठी केली. ते आज प्रसारमाध्यमे किंवा सोशल मीडियावर दिसत नाहीत. हे समोर आणण्यासाठी आम्हाला हा प्रवास करावा लागल्याचे म्हटले आहे. या यात्रेत केवळ राहुल गांधीच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्ष अनेक नेते चालले. राजाचा आत्मा हा ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्समध्ये आहे. याच राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. तो माझ्या आई समोर रडला. तो म्हणाला, मला लाज वाटते की या सत्तेशी लढण्याची हिंमत माझ्यात नाही, मला तुरुंगात जायचे नाही. या प्रकाराने हजारो लोकांना घाबरले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते ही घाबरून भाजपमध्ये गेले, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

त्यांची ५६ इंचाची छाती नाही

तर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी, त्यांची ५६ इंचाची छाती नाही, ते फक्त केवळ पोकळ व्यक्ती आहेत, असं म्हटले आहे. तर मोदी सरकारच्या सत्तेमुळे मणिपूरमध्ये गृहयुद्धाचे वातावरण निर्माण झाले. मुंबई हे प्रतिभेचे केंद्र असून मोदी शक्ती मिळून लोकांना नष्ट करण्यात गुंतलेली आहे. मुंबईतील धारावी चीनमधील शेन्झेनपेक्षा प्रगत आहे. फक्त येथील मुलांसाठी बँकेचे दरवाजे उघडा. येथे २२ लोकांकडे भारतातील ७० कोटी लोकांएवढा पैसा आहे. भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र लग्नासाठी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ १० दिवसांत उघडते, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी अंबानी यांच्यावरून केला आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्यांना ३५ हजार कोटी

मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत

'हा देश ९० अधिकारी चालवतात. मी आतून व्यवस्था पाहिली आहे, म्हणूनच मोदीजी मला घाबरतात. माझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. त्यापैकी तीन अधिकारी मागासलेले आहेत. ३ दलित आहेत. हे ९० लोक पॉलिसी बनवतात. हीच खरी शक्ती भारत चालवतात. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाला हे यंत्र कसे चालते दाखवण्याची विनंती केली. मात्र तसे झाले नाही. निवडणूक आयोग कागद मोजत नाही. तर लोक जीएसटी भरतात. तेवढीच रक्कम अदानीही देतो. मग पैसा जातो कुठे? तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे नरेंद्र मोदीजींचे काम आहे. कधी ते म्हणतील- चीनकडे बघा, पाकिस्तानकडे बघा. कधीतरी मोबाईलची लाईट लावतील. पण मला प्रवासात सर्व दु:ख आणि वेदना दिसल्या. आज भारतात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे', राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आम्हीच हवा भरली

हीच मुंबई आहे जेथे इंग्रजांना महत्मा गांधी यांनी चलो जावं म्हटले होते. आज भाजपला चले जावं म्हणण्याची वेळ आली आहे. भाजप हा फुगा असून यात आम्हीच हवा भरली होती. आज ती हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे. यामुळेच ते ४०० पारचा नारा देत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच ठाकरे यांनी, ४०० पार म्हणजे फर्नीचरचे दुकान घालणार आहात का? असा सवाल भाजपला करताना, देशात चांगली स्थिती नसून काश्मिर पासून कन्याकुमारी पर्यंत स्थिती सारखीच आहे. आमची लढाई ही मोदी, शाहा यांच्याविरोधात नसून लोकशाही, संविधान वाचवण्याची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजप छोडो असा नारा द्यावा लागेल

इथे देशातील अनेक नेते एकत्र आले आहेत. ते फक्त देशातील परिस्थिती बदल करण्यासाठी आले आहेत. देशात सगळीकडे एकच गाणे वाजते, मोदी की गॅरंटी. पण सध्या मोदीची गॅरंटी नको आहे. मोदींनी देशाला खोटी गॅरंटी दिली. यामुळे महात्मा गांधी यांनी मुंबईतून इंग्रजांविरोधात छोडो भारतचा नारा दिला. आता त्याच शहरातून भाजप छोडो असा नारा द्यावा लागेल असे शरद पवार म्हणाले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्यांना ३५ हजार कोटी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी, 'आपण सोबत असू किंवा नसू आपण एकत्र लढलं पाहिजे', असं आवाहन इंडिया आघाडीच्या सभेतून सर्व पक्षीय नेत्यांना केले. तसेच सध्या इलेक्टोरल बॉन्ड आले आहेत. यावरून मोदी, शाहा यांनी इलेक्ट्रोल बोण्डवरून उत्तर द्यायला हवे. याबाबत विरोधकांनी प्रश्न विचारायला हवेत. तसेच मोदी म्हणातात की, हा देश माझा परिवार आहे मग या परिवारातील एक महिला त्यांच्याबरोबर का राहत नाही. त्यांनी शेवटच्या चार दिवसात आपल्या पत्नीसोबत राहवं. आज ईव्हीएमबाबत बोलले जात आहे. मात्र मी गेल्या चार वर्षांपासून याबाबत लढत असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी शिवतीर्थावर

दरम्यान सभेपूर्वी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुतळ्याला फुलं अर्पन केली. यानंतर राहुल गांधी यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. याआधी राहुल गांधी यांनी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावरील गांधी स्मृती स्तंभाला अभिवादन केले होते. तर शनिवारी (ता.१६) त्यांनी आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ असणाऱ्या चैत्यभूमीला भेट दिली होती.

भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा दोन महिन्यापूर्वी मणिपूर येथून सुरू झाली होती. तर १४ जानेवारी रोजी मणिपूर येथून झालेली न्याय यात्रा १५ राज्ये आणि ११० जिल्ह्यांचा दौऱ्यात ६७०० किमी प्रवास राहुल गांधी यांनी केली आहे. मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रेचा नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून महाराष्ट्रात रविवारी समारोप झाला.

भारत जोडो यात्रा

तर याआधी राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रेचा १४५ दिवसांचा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपला होता. ज्यात राहुल गांधी यांनी ३५७० किलोमीटरच्या प्रवासात १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा दौरा केला होता. तर राहुल यांनी १२ सभांना संबोधित करताना १०० हून अधिक सभा आणि १३ पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. तसेच २७५ हून अधिक चर्चांमध्ये भाग घेतला होत. तर श्रीनगरमधील समारोपाच्या वेळी, 'मी ही यात्रा माझ्यासाठी किंवा काँग्रेससाठी नाही तर देशातील जनतेसाठी करत आहे. या देशाचा पाया उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात लढणे आमचे उद्दिष्ट आहे' असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com