Farmer Protest : संसद आवारात शेतकरी नेत्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं? राहुल गांधींना भेटण्यास मनाई

Rahul Gandhi : हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना बुधवारी संसद आवारात अडवण्यात आले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भेटण्यापासून देखील रोखण्यात आल्याचे समोर आले आहे. 
Farmer Protest
Farmer ProtestAgrowon
Published on
Updated on

Pune News : हरियाणाच्या शंभू सीमेवर हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. तर शेतकऱ्यांना भाजप व्यतिरीक्त इतर खासदारांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली होती. त्यासाठी शेतकरी नेते बुधवारी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. राहुल गांधी यांनी त्यांना बोलावले होते. मात्र बुधवारी (ता. २४) संयुक्त किसान मोर्चा (बिगर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या प्रतिनिधींना संसदेच्या संकुलात प्रवेश देण्यात आला नाही. त्यांना गेटवरच थांबवण्यात आले. या प्रकरणावरून आता जोरदार चर्चा झाली असून  शेतकरी नेत्यांना संसदेच्या आवारात का येऊ दिले जात नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. 

हमीभाव कायद्यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यादरम्यान हरियाणा -पंजाब उच्च न्यायालयाने शंभू सीमा उघडण्याचे आदेश दिले असूनही हरियाणा पोलिसांनी बॅरिगेट्स हटवलेले नाहीत. तर सर्वोच्च न्यायालयात हरियाना-पंजाब उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे अद्याप शंभू सीमा उडण्यात आलेली नाही. मात्र शेतकरी संघटना दिल्ली चलोवर ठाम आहेत. 

Farmer Protest
Farmers Protest : शेतकरी संघटनांचा हरियाणा सरकारला १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम; शंभू सीमेवरून पंढेर यांचा हल्लाबोल

याचदरम्यान राहुल गांधी शेतकरी नेत्यांना भेटायला बोलावले होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांची अडवणूक केली. यावरून राहुल गांधी यांनी, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना ते फक्त शेतकरी असल्याने अडवले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते शेतकरी असल्यानेच त्यांना आत येऊ दिले जात नसून त्यांना परवानगी नाकारली जात असल्याचे म्हटले आहे. यावरून काँग्रेसने आणि माध्यमांधून सरकारविरोधात संतोष व्यक्त केल्यानंतर आता शेतकऱ्यांना राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सोडण्यात आले आहे. पंजाब आणि हरियाणामधील १२ शेतकरी नेते राहुल गांधींना भेटण्यासाठी संसद भवनात पोहोचले आहेत. काँग्रेस खासदार अमरिंदर सिंग राजा बुडिंग यांच्यासोबत ते संसद भवन संकुलात पोहोचले होते. 

Farmer Protest
Farmers Protest : शेतकरी संघटनांचा सरकारविरोधात एल्गार; ९ ऑगस्टला ट्रॅक्टर मोर्चा

यादरम्यान तृणमूल काँग्रेसने यापूर्वीच केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. तर काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बुधवारी संसद भवनात शिष्टमंडळासोबत बैठक होणार होती. शेतकरी नेते राहुल गांधींना त्यांच्या पूर्वीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासगी सदस्य विधेयक आणण्याची विनंती करण्यार असल्याचे बोलले जात आहे. 

शंभू आणि खनौरी सीमेवर १६१ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकरी स्वामिनाथन फॉर्म्युला (C2+50%) वापरून पीक उत्पादन खर्च देण्याची आणि सर्व पिकांसाठी हमीभाव कायद्याची मागणी करत आहेत. याच मागणीसाठी राहुल गांधी यांची शेतकरी नेते भेट घेणार होते. तसेच त्यांना आपल्या मागण्या समजून सांगणार होते. 

सीमा उघडताच 'दिल्ली चलो'

शेतकरी नेते आणि राहुल गांधी यांची आज भेट होणार आहे. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयात शंभू सीमा खुली करण्याबाबत सुनावणी आहे. तर १० जुलै रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शंभू सीमेवरील बॅरिकेडिंग हटवून महामार्ग खुला करण्याचा आदेश दिला होता. पण शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर सात थरांचे बॅरिकेड्स लावलेले हटवलेले नाहीत. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय कोणता आदेश देतं याकडे आंदोलक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यानंतरच पंजाब-हरियाणा सीमा खुली होताच दिल्ली चलोला सुरूवात केली जाईल, असे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com