Forest Fire : सातपुड्यात वणवे थांबविण्याबाबत हवी योजना

Wild Fire : खानदेशात नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर या भागालगत सातपुडा पर्वत आहे.
Forest Fire
Forest FireAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सातपुडा पर्वतात वणवे पेटण्यास या महिन्याच्या अखेरीस मागील वेळेस सुरवात झाली होती. यात दरवर्षी मौल्यवान वनसंपदेची हानी होत असून, वणवे पेटण्याचे प्रकार थांबविण्यासाठी ठोस उपाय, धोरण किंवा योजना हवी, असा मुद्दा पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.

खानदेशात नंदुरबारातील अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा, धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल व रावेर या भागालगत सातपुडा पर्वत आहे. सातपुड्याच्या पलिकडे मध्य प्रदेश आहे. यावल अभरारण्याचा ठेवा याच सातपुडा भागात आहे.

Forest Fire
Forest Fire Prevention : जंगलांना वनव्यापासून वाचवण्यासाठी जाळरेषा रचण्यास सुरुवात

त्यासंबंधी अनेक घोषणा, योजना आहे. वन विभागाचा मोठा ताफा सातपुड्याच्या सुरक्षेसाठी आहे. परंतु वणवे दरवर्षी पेटतात. त्यावर नियंत्रण आले की वन विभाग पुढे शांत होतो. पण वणवे का पेटतात की जाणीवपूर्वक पेटविले जातात,

Forest Fire
Forest Fire : पोलादपुरात वणव्यांमुळे वनसंपदा धोक्‍यात

याचा शोध घेतला जात नाही. अमूल्य डिंक निर्मितीसाठी हे वणवे पेटविले जातात. झाडांना आग लावल्यास डिंक चांगला तयार होतो, असा समज चोरट्या, माफिया मंडळीत आहे. तसेच काही वृक्ष पेटल्यानंतर त्यांची कत्तल करून वाहतूकही सोपी होते.

यामुळे हे वणवे दरवर्षी पेटतात, असा दावा जाणकार, पर्यावरणप्रेमी करतात. काही स्वयंसेवी संस्था सातपुड्याच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु अवैध वृक्षतोड सुरूच आहे. अनेकदा सागवान व अन्य जातीच्या वृक्षांचे बाजारात मागणी असलेले लाकूड जप्त केल्याच्या घटना यावल, चोपडा, रावेर भागात घडतात. कमाल भाग सातपुड्यात बोडका झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com