Seed For Rabi Season : रब्बीसाठी साडेपाच लाख बियाणे कीट वाटणार

Seed Supply : राज्यात रब्बी हंगामासाठी १.४० लाख क्विंटलहून अधिक सुधारित बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.
Seed
SeedAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात रब्बी हंगामासाठी १.४० लाख क्विंटलहून अधिक सुधारित बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच, यंदा नवीन वाणाचे जवळपास साडेपाच लाख बियाणे कीट वाटले जाईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा एक जून ते १६ ऑक्टोबर या दरम्यान सरासरीच्या तुलनेत ११६ टक्के पाऊस झाला. चांगल्या पावसामुळे खरिपात पेरण्या वाढून १०३ टक्क्यांपर्यंत म्हणजेच १४५ लाख हेक्टरच्या पुढे गेल्या होत्या.

राज्याचे रब्बीखालील सरासरी क्षेत्र ५४ लाख हेक्टरच्या आसपास आहे. लांबलेला पाऊस व जलाशयांमधील चांगले साठे यामुळे यंदा रब्बीचा पेरा ६० लाख हेक्टरच्या पुढे जाईल, असे कृषी विभागाला वाटते.

Seed
Seed Supply : महाबीजकडून परभणीत १० हजार क्विंटल बियाणे पुरवठा

रब्बीसाठी एरवी शेतकऱ्यांना १०.४१ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असते. परंतु, यंदा बियाणे उपलब्धता साडेबारा लाख क्विंटलपर्यंत ठेवली जावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच बियाणे बदलाचे प्रमाण ज्वारीमध्ये २२ टक्के, गहू ३७ टक्के, मका १०० टक्के तर हरभऱ्यात ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने सुधारित बियाण्यांचा पुरवठा वाढवावा व पीक प्रात्यक्षिकांच्या संख्येतदेखील वाढ करावी, असे कृषी आयुक्तालयाने क्षेत्रिय पातळीवर सूचित केले आहे.

Seed
Mahabeej Seed : महाबीजकडून रब्बीसाठी ५६ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा

राज्यात यंदा सर्वात जास्त पीक प्रात्यक्षिके हरभऱ्याची होतील. त्यासाठी ८० हजारांच्या क्विंटलच्या पुढे सुधारित बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच, गव्हासाठी ४०६९ क्विंटल, रब्बी ज्वारी ५०५४७ क्विंटल, करडई २६६६ क्विंटल तर जवस बियाण्यांचा ६२५ क्विंटल पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय नवीन बियाणे वाणाच्या कीट वाटप कार्यक्रमात रब्बी ज्वारीसाठी सर्वाधिक कीट वाटले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्वारीचे ४.८५ लाख कीट, हरभऱ्याचे १२,३५० तर मसुराचे ५० हजार कीट वाटले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन व भाताची काढणी केल्यानंतर लगेच हरभरा पीक घेतल्यास राज्याचे कडधान्याखालील क्षेत्र किमान साडेचार लाख हेक्टरने वाढू शकते, असे विस्तार विभागाला वाटते.

पाण्याचे साठे चांगले असल्यामुळे यंदा राज्याच्या रब्बी हंगामाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कृषी विभागाने मागणीच्या तुलनेत रब्बीसाठी १२० टक्के म्हणजेच साडेबारा लाख क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करुन दिली आहे.
- रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com