Rabi Sowing : अकोल्यात रब्बीची १०० टक्के पेरणी आटोपली

Rabi Season : गेले काही दिवस रखडलेली रब्बी पेरणी गेल्या आठवड्यात जोमाने झाल्यामुळे जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र पेरणी खाली आले आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News : गेले काही दिवस रखडलेली रब्बी पेरणी गेल्या आठवड्यात जोमाने झाल्यामुळे जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र पेरणी खाली आले आहे. एक लाख २१ हजार १०४ हेक्टरच्या तुलनेत पेरणी १ लाख २२ हजार हेक्टरवर पोहोचली. आणखी काही दिवसांत या क्षेत्रात भर पडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ३१० हेक्टर आहे. यंदा या क्षेत्राच्या ९३ टक्के म्हणजेच ९३ हजार १४३ हेक्टरवर पेरणी झाली. मागील आठवड्यापर्यंत हे क्षेत्र ६५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचलेले होते. आठवडाभरात उर्वरित लागवड वेगाने झाली. गव्हाचे क्षेत्र यावर्षी सरासरीच्या पुढे गेले.

Rabi Sowing
Rabi Season : यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन

जिल्ह्यात सरासरी १९ हजार २४० हेक्टर क्षेत्र असून यंदा २१ हजार ४७५ हेक्टरवर पेरणी आटोपली. पुढील काही दिवस गव्हाची लागवड सुरू राहणार असून पेरणी क्षेत्र वाढणार आहे. या वर्षात काटेपूर्णा, वान प्रकल्पातून आवर्तने मिळत असल्याचा फायदा रब्बी पेरण्यांना होत आहे. त्याबरोबरच नोव्हेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्याचाही मोठा फायदा लागवडीला झाल्याचा दावा केला जात आहे.

आठवडाभरात बदलले चित्र

गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. मात्र, एका आठवड्यात ही पेरणी जोमाने होऊन १०० टक्के सरासरी क्षेत्र लागवडीखाली आले. प्रामुख्याने गव्हाची लागवड अधिक प्रमाणात करण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत.

Rabi Sowing
Rabi Season : रब्बी हंगामातील आपत्कालीन पीक व्यवस्थापन

तुलनेने ज्वारीची लागवड कमी झाल्‍याचे दिसून आले. ज्वारी पिकाला वन्यजिवांकडून होणारे नुकसान पाहता शेतकरी इतर पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. मका, सूर्यफूल या पिकांचीही जेमतेम लागवड आहे. कांदा लागवड पाच हजार हेक्टरच्या पुढे निघाली आहे. कांदा बीजोत्पादनाकडेही शेतकऱ्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पीक सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्के

गहू १९२४० २१४७५ ११२

हरभरा १००३०९ ९३१४३ ९३

ज्वार ९११ ८४२ ९२

मका ३३५ १०५ -----

करडई २६३ ६८ -----

कांदा --- ४९१७ -----

भाजीपाला --- १५३३ -----

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com