
Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात शुक्रवार (ता. २२) पर्यंत २ लाख ८६ हजार ८२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात परभणी जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार २२१ हेक्टर (६५.८१ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ६०५ हेक्टर (६१.४० टक्के) पेरणी क्षेत्राचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २२) पर्यंत २ लाख ७० हजार ७९४ पैकी १ लाख ७८ हजार २२१ हेक्टरवर (६५.८१ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ६६ हजार २५८ हेक्टर (५८.५९ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी ९ हजार १८९ हेक्टर (२३.३८ टक्के),मक्याची २ हजार ८६ पैकी २६४ हेक्टर (१२ टक्के) पेरणी झाली.
त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ लाख १२ हजार १७० हेक्टर (९०.५४ टक्के) पेरणी झाली. करडईची ३ हजार ३७१ पैकी ८२६ हेक्टर (२४.५०टक्के), जवसाची ११९ पैकी २७ हेक्टर (२२.६९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी ८ हेक्टर (२३.७८ टक्के) पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ८ हजार ८९१ हेक्टरवर (६१.४० टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ५ हजार ४४२ हेक्टर (६८.२९ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ९ हजार ३०६ हेक्टर (२१.८९ टक्के), मक्याची ९७१ पैकी १४८ हेक्टर (१५.२६टक्के) पेरणी झाली.
हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी ९० हजार ५८४ हेक्टर (७५.३९ टक्के) पेरणी झाली. करडईची २०५ पैकी ४९४ हेक्टर (४९४ टक्के) पेरणी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.