Rabi Season 2024 : रब्बीच्या बियाण्यांची लॉटरी आचारसंहितेच्या कचाट्यात?

Rabi Seed : यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा, करडई, गहू व ज्वारीचे प्रमाणित बियाणे अनुदानावर तर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातून मोफत देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले.
Rabi Seed
Rabi SeedAgrowon
Published on
Updated on

Latur News : यंदा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा, करडई, गहू व ज्वारीचे प्रमाणित बियाणे अनुदानावर तर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातून मोफत देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. मोठ्या संख्येने अर्ज केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोन दिवस आधी ऑफलाईन लॉटरी काढण्याचे आदेश देण्यात आले.

या गोंधळात कुठे लॉटरी काढली गेली तर कुठेही ही लॉटरी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. यामुळे कुठे बियाण्यांचे वाटप सुरू तर कुठे बियाणे वाटपासाठी अजूनही वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा तालुका कृषी कार्यालयांना आहे.

रब्बी हंगामात कृषी विभागाच्या वतीने अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य पिके योजनेतून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे अनुदानावर वाटप केले जाते. बॅगमागे दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे. यासोबत पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातूनही एक एकर क्षेत्रासाठी मोफत बियाण्यांसह विविध प्रकारच्या निविष्ठांचा मोफत पुरवठा करण्यात येतो. दोन्ही योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले.

Rabi Seed
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचा पेरा ३१ हजार हेक्टरवर

काही दिवसानंतर ऑफलाईन अर्जही घेण्याची सूचना करण्यात आली. यात दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन सोडत निघून शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे वाटत असताना कृषी विभागाने अचानक निर्णय फिरवला. आचारसंहिता लागू होण्यासाठी दोन दिवस राहिले असतानाच तालुका कृषी कार्यालयांना त्यांच्या पातळीवर ऑफलाईन सोडत करण्याचे आदेश दिले गेले.

काही कार्यालयांनी तातडीने सोडत काढून पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमातून लाभार्थीं शेतकऱ्यांची निवड केली तर काही कार्यालयांची सोडत आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली. काही कार्यालयांनी सोडत काढून दोन्ही योजनांतील बियाण्यांचे वाटप सुरू केले. काही तालुका कार्यालयांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अनुदानावरील व मोफत बियाणे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

Rabi Seed
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

आचारसंहितेचा फटका बसू नये म्हणून अधिकारी काळजी घेत असून आचारसंहिता संपल्यानंतरच बियाण्यांचे वाटप करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. तोपर्यंत रब्बीच्या पेरण्या संपणार असून बियाण्यांचा काहीच उपयोग होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात अजून तरी बहुतांश कार्यालयात दोन्ही योजनांतील शेतकरी लाभार्थींची निवड करायची की नाही, याबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे.

लातूर तालुक्यात वाटप सुरू

याबाबत लातूरचे तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत म्हणाले, की आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवस आधी ऑफलाईन सोडत काढण्याचे आदेश आले. त्यानंतर लागलीच पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमात ४७५ शेतकऱ्यांची निवड केली व त्यांना बियाण्यांचे वाटपही सुरू केले आहे. अनुदानावर प्रमाणित बियाण्यांसाठी अर्ज केलेल्या सर्व चौदाशे शेतकऱ्यांना परमीट देण्यात येत आहे. काही ठिकाणी आचारसंहितेमुळे वाटप रखडल्याची माहिती मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com