Smartchem Fertilizer : स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडची गुणवत्तापूर्ण खते

मागील तीन दशकांपासून कंपनीतर्फे ‘महाधन’ ब्रँड अंतर्गत विविध प्रकारच्या खतांची यशस्वीपणे निर्मिती करून त्याचा पुरवठा केला जातो. कंपनीतर्फे महाधन २४:२४:०, स्मार्टेक १०:२६:२६, स्मार्टेक १२:३२:१६, स्मार्टेक २०:२०:०:१३, बेनसल्फ सुपरफास्ट, विद्राव्य खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली आहेत.
Smartchem Fertilizer
Smartchem FertilizerAgrowon
Published on
Updated on

स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Smartchem Technologies Ltd) (एसटीएल) ही दीपक फर्टिलायझर्स (Deepak Fertilizers) व पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (डीएफपीसीएल) संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे. मागील तीन दशकांपासून कंपनीतर्फे ‘महाधन’ ब्रँड (Mahadhan) अंतर्गत विविध प्रकारच्या खतांची (Fertilizer) यशस्वीपणे निर्मिती करून त्याचा पुरवठा (Fertilizer Supply) केला जातो. कंपनीतर्फे महाधन २४:२४:०, स्मार्टेक १०:२६:२६, स्मार्टेक १२:३२:१६, स्मार्टेक २०:२०:०:१३, बेनसल्फ सुपरफास्ट, विद्राव्य खते (Soluble Fertilizer) शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली आहेत.

Smartchem Fertilizer
Fertilizer : खत परवाना कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

महाधन खत कंपनीने पिकानुरूप सर्व अन्नद्रव्ययुक्त अशा क्रॉपटेक तंत्रज्ञानातून ‘महाधन क्रॉपटेक’ या खताची निर्मिती करून कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. यामध्ये मुख्य अन्नद्रव्यांसमवेत दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत. यामध्ये पिकासाठी उपयुक्त न्यूट्रिएंट अनलॉक टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे क्रॉपटेकच्या प्रत्येक दाण्यांमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता होते.

Smartchem Fertilizer
Fertilizer : लिंकिंगला विरोध करताच तपासणी मोहीम

हे खत विक्रेत्यांमार्फत ‘महाधन'ने बाजारात सर्वत्र उपलब्ध केले आहे. याचे पुढचे पाऊल म्हणजे महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ तसेच समुन्नती ॲग्रो सोल्यूशन्ससारख्या वित्तीय संस्थाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांना या खताची उपलब्धता करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कांदा, ऊस पिकासाठी क्रॉप टेक खताचा वापर करून दर एकरी उत्पन्नात वाढ करावी. कांदा पिकासाठी क्रॉपटेक ओनियन ८:२१:२१ आणि ऊस पिकासाठी ९:२४:२४ या ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत. येत्या हंगामात कापूस, मका पिकासाठीसुद्धा महाधन क्रॉपटेक खत बाजारात आणण्याचा कंपनीचा मानस आहे.

क्रॉपटेक खताची वैशिट्ये :

१) कांदा, ऊस पिकास लागणाऱ्या नत्र, स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये, तसेच जस्त, लोह, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा.

२) क्रॉपटेक वापरामुळे कांदा, ऊस उत्पादनात १० ते १२ टक्के वाढ. एकूण अन्नद्रव्य व्यवस्थापन खर्चात २० टक्के बचत.

संपर्क ः नरेश देशमुख, ९८२२५९९७४२

(नरेश देशमुख हे स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीत ईवीपी अँड हेड - सेल्स अँड मार्केटिंग (क्रॉप न्यूट्रिशन बिझनेस) या पदावर कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com