Pulses Variety : कुळीथ, मटकीच्या वाणांची गुणवैशिष्ट्ये

Agriculture Cultivation : आंतरपीक म्हणूनही कुळीथ आणि मटकी पिकाची लागवड केली जाते. या दोन्ही कडधान्यवर्गीय पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे.
Pulses Farming
Pulses FarmingAgrowon

Horse Gram and Kidney Bean Farming : कडधान्य गटातील अत्यंत महत्त्वाची पिके म्हणून मटकी आणि कुळीथ लागवड केली जाते. कमी पावसावर चांगले उत्पादन देणारे, पाण्याचा ताण सहन करू शकणारे आणि विशेषतः कोरडवाहू भागात लागवडीसाठी महत्त्वाचे कडधान्यवर्गीय पीक म्हणून कुळीथ किंवा हुलगा पीक ओळखले जाते.

तर मटकीचे पीक लवकर जमीन झाकत असल्यामुळे उतार असलेल्या जमिनीत पावसाच्या पाण्याद्वारे मातीची होणारी धूप थांबविण्यासाठी मटकीची उताराला आडवी पट्टापेर पद्धतीने पेरणी  केली जाते. तसेच आंतरपीक म्हणूनही कुळीथ आणि मटकी पिकाची लागवड केली जाते. या दोन्ही कडधान्यवर्गीय पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे.

Pulses Farming
Urad Varieties: सुधारित उडीद लागवड तंत्र

कुळीथ वाण

सीना

प्रसारण वर्ष : १९८४, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

पिकाचा कालावधी : ११५ ते १२० दिवस.

वैशिष्ट्ये : फिक्कट रंगाचे तपकिरी दाणे, निमपसरा, पिवळ्या विषाणू रोगास प्रतिकारक्षम.

हेक्टरी उत्पादन ः ७ ते ८ क्विंटल.

माण

प्रसारण वर्ष : १९८६, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

पिकाचा कालावधी : १०० ते १०५ दिवस.

वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग राखाडी, उभट वाढणारा वाण, लोहाचे प्रमाण ३६.२३ मि.ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम.

हेक्टरी उत्पादन : ६ ते ७ क्विंटल.

Pulses Farming
Brinjal Varieties : अशी करा वांग्याच्या वाणाची निवड

फुले सकस

प्रसारण वर्ष : २०१६, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

पिकाचा कालावधी : ९० ते ९५ दिवस.

वैशिष्ट्ये : लवकर तयार होणारा वाण, दाण्याचा रंग विटकरी, प्रथिनांचे प्रमाण २२.०९ टक्के, लोहाचे प्रमाण ३७.८६ मि.ग्रॅ. (प्रति १०० ग्रॅममध्ये), वाढीचा प्रकार उभट.

हेक्टरी उत्पादन : ८ ते १० क्विंटल.

मटकी वाण

एमबीएस २७

प्रसारण वर्ष : १९८९, पश्चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.

पिकाचा कालावधी : १२५ ते १३० दिवस.

वैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक, भुरी रोगास काही प्रमाणात प्रतिकारक.

हेक्टरी उत्पादन : ६ ते ७ क्विंटल.

फुले सरिता (एमबीएस -८०३)

प्रसारण वर्ष : २०२०, पश्‍चिम महाराष्ट्रासाठी प्रसारित.

पिकाचा कालावधी : ११८ दिवस.

वैशिष्ट्ये : लवकर पक्वता, पिवळ्या विषाणू रोगास मध्यम प्रतिकारक.

हेक्टरी उत्पादन : ६ क्विंटल.

मोट नं. ८८

प्रसारण : विदर्भासाठी प्रसारित.

पिकाचा कालावधी : १२० दिवस.

वैशिष्ट्ये : जाड दाण्याचा भुरी रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.

हेक्टरी उत्पादन : ४ क्विंटल.

डॉ. आदिनाथ ताकटे (मृदा शास्रज्ञ), ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com