Team Agrowon
महाराष्ट्रात विविध भागांत आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णाकाठची चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत.
अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात.
खानदेशात भरताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीच सर्वांना आवडतात.
महाराष्ट्रातील हवामानात तिन्ही हंगामात वांग्याची लागवड करता येते. खरीप हंगामासाठी पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि रोपांची लागवड जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते.
वांग्याच्या वाणाची निवड करताना वाण भरपूर उत्पादन देणारा, रोग-कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तेथील हवामानाशी मिळते-जुळते घेणारा असावा.
वांग्याची लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित वाणाची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत.
वाणांची निवड करताना प्रामुख्याने त्या त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणारा तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते.