Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Tractor Use : येवल्यात ५० कोटींची उलाढाल; ३०० मोटारसायकल, १०० वर चारचाकींची विक
Agriculture Tractor
Agriculture TractorAgrowon
Published on
Updated on

Yevala News : येवला : मंदित असलेल्या वाहन बाजाराला दसऱ्याच्या निमित्ताने मोठा बूस्ट मिळाला असून येथे वाहन बाजार तेजीत राहिला. फक्त मोटारसायकलच नव्हे तर ट्रॅक्टर व चारचाकी वाहनांच्या विक्रीतून ५० कोटींवर उलाढाल बाजारात झाली. १५० वर ट्रॅक्टर, ३०० च्या आसपास मोटरसायकल, तर शंभरावर चार चाकी वाहने आणि जुन्या-नव्या वाहनांची खरेदी-विक्री झाली. आठमाही बागायती शेती असलेला तालुका असला तरी पालखेडसह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भागात बारमाही शेती पिकली जाते.

बैलांद्वारे शेती आता कमी होत असून प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती करतो. मागील काही वर्षात येथील बाजारपेठेत ट्रॅक्टरची खरेदी काहीशी मंदावलेली होती. मागील वर्ष तर दुष्काळातच गेल्याने खरेदी-विक्री पूर्णतः ठप्प होती. मात्र यावर्षी पावसाने साथ दिली असून खरीपही जोमात आहे. उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी ट्रॅक्टर खरेदीकडे वळाल्याचे दिसले. शेतीमालाच्या भावात अस्थिरता असूनही तालुक्यात यंदा विक्रमी ट्रॅक्टर विक्री झाली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना विविध बँकांसह फायनान्स कंपन्या लागलीच कर्ज उपलब्ध करून देतात तसेच ट्रॅक्टरला अण्णासाहेब महामंडळाच्या कर्जयोजनेने शेतकऱ्यांना हात दिल्याने विक्रमी ट्रॅक्टर खरेदी झाली.

Agriculture Tractor
Tractor Market : पाऊस नाही तरीही वाढली ट्रॅक्टरची विक्री

येथे संजय बनकर यांचे पॉवरट्रॅक कंपनीचे, माधव बनकर यांचे सोनालिकाचे तर महेंद्र काले यांचे महिंद्रा कंपनीचे व गुजराथी यांचे जॉन डियर कंपनीच्या ट्रॅक्टरची डिलरशिप आहे. या चारही ठिकाणी शेतकऱ्यांनी खरेदीला गर्दी केली होती. या शोरूमसह जुन्या ट्रॅक्टर विक्रीचेही मार्केट असून सर्वत्र मिळून १५० वर ट्रॅक्टरची विक्री झाल्याचा अंदाज आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर शहर व तालुक्यात मोटरसायकलचा बाजारही तेजीत होता. शहरात प्रमुख कंपन्यांची मोटरसायकलची शोरूम असून सर्वत्र ग्राहकांची पसंती होती. अंदरसुल येथेही शोरूम आहे. याशिवाय जुन्या गाड्यांचाही मोठा बाजार शहरात असून जुन्या नव्या पाचशेवर मोटरसायकलींची विक्री झाल्याचा अंदाज आहे. प्रथमच मोठ्या प्रमाणात जुन्या-नव्या चारचाकी वाहनांची खरेदी येथे झाली. येथील शोरूममधून तसेच अनेकांनी नाशिक येथूनही नव्याने चार चाकी वाहने खरेदी केली. विशेषतः सीएनजी वाहनांना जास्त मागणी असल्याचे दिसून आले. शंभराच्या आसपास वाहने विक्री झाली.

मागील एक-दोन वर्षे ट्रॅक्टरची खरेदी मंदावली होती. शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यावश्यक बनल्याने या वेळी ट्रॅक्टरला मोठी मागणी राहिली. गरज असल्याने कर्ज काढून देखील शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतात. दुचाकीदेखील आवश्यक असल्याने मोटरसायकलना मोठी मागणी दिसली. - संजय बनकर, संचालक, पॉवर ट्रॅक, ट्रॅक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com