Cotton Procurement : ‘सीसीआय’कडून हमीभावाने १ लाख क्विंटल कापूस खरेदी

Cotton Market : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या कापूस खरेदी हंगामात सोमवारपर्यंत (ता. ९) भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ८ केंद्रावर १ लाख ९ हजार ४४९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या कापूस खरेदी हंगामात सोमवारपर्यंत (ता. ९) भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ८ केंद्रावर १ लाख ९ हजार ४४९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. सीसीआयकडून हमीभावानुसार प्रतिक्विंटल किमान ७२७५ ते कमाल ७५२१ रुपये दर देण्यात आले.

खासगी व्यापाऱ्यांकडून १ लाख ७० हजार ४२४ क्विंटल कापसाची प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७२५० रुपये दराने खरेदी करण्यात आली. या दोन जिल्ह्यांमध्ये सीसीआय आणि खासगी मिळून एकूण २ लाख ७९ हजार ८७३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोनअंतर्गत यंदा परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड, हिंगोली, शिरडशहापूर या ८ ठिकाणच्या १६ जिनिंग कारखान्यांमध्ये सीसीआय तर्फे किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे.

Cotton
Cotton Procurement : ‘सीसीआय’ने खरेदी केला ३३ लाख गाठी कापूस

सोमवारपर्यंत (ता. ९) परभणी जिल्ह्यातील ६ खरेदी केंद्रांवर ९० हजार ६४४ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७२७५ ते कमाल ७५२१ रुपये दर देण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील २ खरेदी केंद्रांवर १८ हजार ८०५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७२७५ ते कमाल ७५२१ रुपये दर मिळाले. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी सुरू आहे.

सोमवारपर्यंत (ता. ९) परभणी जिल्ह्यातील ३५ जिनिंग कारखान्यांमध्ये १ लाख ६२ हजार ४५२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विटंल किमान ६८०० ते कमाल ७२५० रुपये दर मिळाले. हिंगोली जिल्ह्यात ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ७ हजार ९२२ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७१०० रुपये दर मिळाले, अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

परभणी-हिंगोलीतील कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

सीसीआयची खरेदी

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी १ १०,२६३ ७,८५६ ते ७,४८३

जिंतूर १ ८,२९९ ७,२७५ ते ७,५२१

बोरी २ २५,४५१ ७,३५० ते ७,५२१

सेलू ५ ११,१४७ ७,३५६ ते ७,४७१

मानवत ३ ३०,९६९ ७,३५६ ते ७,४७१

गंगाखेड २ ४,५१५ ७,३३३ ते ७,४५९

हिंगोली १ ५,६०७ ७,२०० ते ७,५२१

शिरडशहापूर १ १३,१९८ ७,२७५ ते ७,५२१

खासगी व्यापारी खरेदी

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रपये

परभणी ४ १५,८४८ ७,०७० ते ७,२३५

जिंतूर ४ ८,९५६ ७,००० ते ७,१५०

बोरी १ ३,४९४ ६,९०० ते ७,१००

सेलू ६ २२,४३५ ६,८०० ते ७,२५०

मानवत १३ ६८,७२२ ७,००० ते ७,२००

पाथरी ० ९,३३४ ६,८५० ते ७,०५०

सोनपेठ १ ६,०३४ ६,८०० ते ७,१००

गंगाखेड ६ २३,४७० ७,००० ते ७,१५०

ताडकळस ० ४,१५९ ६,८०० ते ७,२५०

हिंगोली ४ ५,१०० ६,८०० ते ७,१००

शिरडशहापूर ० २,८७२ ६,८०० ते ७,१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com