Sangli News : जिल्ह्यात यावर्षी मुसळधार पाऊस झाला आहे. त्याची आजअखेर १७३ टक्के पावसाने हजेरी लावली. मात्र, खरीप हंगामातील तूर, मूग, भुईमूग बाजरी पिकाची काढणी लांबणीवर पडली आहे. त्यातच सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
गेल्या वर्षी पाऊस नव्हता, दुष्काळ होता. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिके गेली. यावर्षी वेळेत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपातील पिके बहरली. यावर्षी जूनमध्ये सरासरीच्या १७५ टक्के, जुलैमध्ये २०९ टक्के, ऑगस्टमध्ये १९८ टक्के, तर सप्टेंबरमध्ये आजअखेर १०३ टक्के इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
दुष्काळी भागातसह अन्य तालुक्यांत आगाप पेरणी केलेल्या पिकांची काढणी सुरू झाली होती. मात्र पिकांच्या काढणीच्या दरम्यान, पुन्हा पावासाला सुरुवात झाली. त्यामुळे पिकांच्या काढणीला ब्रेक लागला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
गत वर्षी दोन्ही हंगाम वाया गेल्याने यंदा खरीप हंगामातून दोन पैसे हाती पडतील, अशी आशा होती. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने पदरी निराशाच पडली आहे. परतीचा पाऊस सुरू झाला असल्याने दुष्काळी भागात रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे.
तालुका सरासरी पाऊस यंदाचा पाऊस टक्के
मिरज ३८७ ७४२ १९१
जत ३८२ ५४६ १४२
खानापूर ४३१ ६४९ १५०
वाळवा ५१७ ११०० २१२
तासगाव ४१४ ८०३ १९४
शिराळा ८२७ १६२८ १९६
आटपाडी २७४ ५११ १८६
कवठेमहांकाळ ३०२ ७२३ २३९
पलूस २६२ ७७४ २९५
कडेगाव ५०५ ७२७ १४४
एकूण ४८६ ८४६ १७३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.