Silk production : पंजाब स्वत:चा रेशीम ब्रँड बाजारात आणणार; रेशीम दिनानिमित्त लाँच केला 'लोगो'

Punjab Silk Products Brand Logo : रेशीम उत्पादनांना चालना देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने पंजाब सरकार प्रयत्न करत आहे. रेशीम उत्पादने स्वतःच्या ब्रँडखाली बाजारात आणण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून ब्रँडचा 'लोगो' लाँच केला आहे.
Silk production
Silk productionAgrowon
Published on
Updated on

Pune News : शेतीशी संबंधित व्यवसाय आणि उत्पादने स्वतःच्या ब्रँडखाली आणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने पंजाब सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी लोगोचा शुभारंभ करण्यात आला आहे. मागसिपा येथे रेशीम दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात फलोत्पादन मंत्री चेतनसिंग जोडामाजरा यांनी शनिवारी (ता.२१) या लोगोचा शुभारंभ केला.

यावेळी नवी दिल्ली येथील केंद्रीय रेशीम मंडळाचे सहाय्यक अधीक्षक मित्तल अशोक भालेराव, सहाय्यक संचालक-सह-रेशीम बलविंदर सिंग, रेशीम व्यवस्थापक जसपाल सिंग यांच्यासह विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Silk production
Silk Cocoon Production : आरक्षणासाठी बीड बंद! बाजार समितीही बंद असल्याने १० ते १२ टन रेशीम कोष शेतावरच अडकला

यावेळी मंत्री जोडामाजरा यांनी २०२५ च्या अखेरीस राज्यातील रेशीम उत्पादन दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. जोडामाजरा म्हणाले की, राज्यातील गुरुदासपूर, होशियारपूर, पठाणकोट आणि रूपनगर या डोंगराळ भागातील जिल्ह्यांतील सुमारे २३० गावांमध्ये रेशीम व्यवसाय केला जात आहे. येथे १२०० ते १४०० रेशीम उत्पादक शेतकरी रेशीम व्यवसायाशी निगडीत आहेत. सध्या बायव्होल्टाईन मलबेरी आणि एरी रेशीम अशा दोन प्रकारचे रेशीम घेतले जाते.

राज्यात दरवर्षी तुती रेशीम बियाण्यांपासून एरी रेशीम सीडपासून ५ हजार ते ८ हजार किलो एरी रेशीम उत्पादन केले जात आहे. राज्यातील दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन लोकांकडून रेशीम उद्योग केला जातो. यातून हे लोक वार्षिक ४० ते ५० हजार रुपये कमावतात. जे खूपच कमी आहे. रेशीम शेतीसाठी खूप मेहनत करावी लागते. पण शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. त्यामुळेच कमी खर्चात सरकार त्यांना रेशीम बियाणे परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणार आहे. यासाठी डलहौसी येथील सरकारचे एकमेव रेशीम बियाणे उत्पादन केंद्र पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती मंत्री जोडामाजरा यांनी दिली.

Silk production
Silk Market : रेशीम कोष विक्रीसाठी बाजार समितीमध्येच आणण्याचे आवाहन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेशीम उत्पादनाच्या रास्त भावासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी सरकार स्वतःचे रीलिंग युनिट पठाणकोट येथे स्थापन करेल. हे युनिट सुरू झाल्यास रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढू शकते असेही मंत्री जोडामाजरा यांनी म्हटले आहे.

पंजाबमधील रेशीम व्यवसाय हा गरीब लोकांच्या मेहनतीवर आधारित असून या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊ शकतो. या व्यवसायाच्या विकासासाठी आणि रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विभागामार्फत अनेक प्रयत्न केले जात असल्याचे फलोत्पादन संचालक शालिंदर कौर यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com