New Farm Laws: केंद्र सरकारच्या नवीन कृषी पणन धोरणाला पंजाब सरकारचा विरोध; तीन कृषी कायदे राबवण्याचा डाव असल्याचा केला आरोप

Central Government : पंजाब सरकारने पत्रात केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांचा दाखला देत शेती राज्याचा विषय असून भारतीय राज्यघटनेच्या २४६ अंतर्गत सातव्या अनुसूची २ मधील २८ व्या नोंदीचा उल्लेख केला आहे. तसेच केंद्र सरकार २०२१ च्या तीन कृषी कायद्यातील वादग्रस्त तरतुदी पुन्हा लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.
FIle Photo
FIle Photo Agrowon
Published on
Updated on

Farmers Protest : केंद्र सरकारच्या नवीन कृषी पणन बाजार धोरणाच्या विरोधात पंजाब राज्य सरकारने भूमिका घेतली आहे. पंजाब सरकारने शुक्रवारी (ता.१०) केंद्र सरकारच्या नवीन कृषी धोरणांचा मसुदा फेटाळून लावला आहे. नवीन कृषी पणन बाजार धोरण म्हणजे वादग्रस्त तीन कृषी कायदे मागच्या दाराने पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पंजाब सरकारने केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे नवीन कृषी पणन धोरणाच्या मसुद्यावरून वातावरण तापलं आहे.

पंजाब सरकारने पत्रात केंद्र सरकार राज्याच्या अधिकारांचा दाखला देत शेती राज्याचा विषय असून भारतीय राज्यघटनेच्या २४६ अंतर्गत सातव्या अनुसूची २ मधील २८ व्या नोंदीचा उल्लेख केला आहे. तसेच केंद्र सरकार २०२१ च्या तीन कृषी कायद्यातील वादग्रस्त तरतुदी पुन्हा लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे. तर शेती राज्याचा विषय असल्याने त्यामध्ये केंद्र सरकारने असे धोरण आणू नये, असंही सांगून कृषी पणन धोरणाचा विषय राज्य सरकारवर सोपवण्यास सांगितलं आहे.

FIle Photo
E Market System : मध्य प्रदेशातील ८३ बाजार समित्यांमध्ये ई-बाजार व्यवस्था

पंजाब व हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी या धोरणाविरोधात आंदोलन करत आहेत. तसेच शेतकरी नेते जगजितसिंह डल्लेवाल गेल्या दीड महिन्यांपासून हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यातच केंद्र सरकारचे नवीन धोरण मागे घेण्याची मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत. याच दरम्यान पंजाब सरकारने धोरण नाकारत केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

पंजाब सरकारने नवीन कृषी पणन धोरणाच्या मसुद्यावर सहा आक्षेप असल्याचं पत्रात सांगितलं आहे. यामध्ये खाजगी बाजारपेठेची स्थापना, शेतीमधील कंत्राटी पद्धतीला प्रोत्साहन, बाजार शुल्कात कपा, मध्यस्थांना देण्यात येणारं कमिशन कपात, शेतमालापासून निर्यातदार आणि मोठ्या प्रमाणात खरेदीदारांपर्यंत थेट खरेदीला प्रोत्साहन देणे आणि गोदामांना खुलं मार्केट यार्ड घोषित करणे यावर पंजाब राज्य सरकारने आक्षेप घेतले आहेत.

FIle Photo
Farmer Protest : संयुक्त किसान मोर्चाने नाकारला ‘एनपीएफएएम’चा मसुदा!

तसेच केंद्र सरकारने पंजाबच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या पिकांच्या किमान आधारभूत किमतीबद्दल मौन बाळगले असल्याची टीकाही पंजाब सरकारने केली आहे. नवीन कृषी पणन धोरणात बाजार समितीला खाजगी बाजार करण्याचा घाट घातला जात असून राज्य सरकार त्याविरोधात आहे. पंजाब सरकारकडे सक्षम बाजार यंत्रणा आहे. परंतु नवीन कृषी धोरणात त्यावरील करात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा नुकसान होईल, असंही पंजाब सरकारने पत्रात लिहिलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com