Pune ZP: पुणे ‘झेडपी’ विभागात पहिली, राज्यात तिसरी

100-day Governance Challenge: मुख्यमंत्री कार्यालयाच्या १०० दिवसांच्या कार्यप्रदर्शन स्पर्धेत पुणे जिल्हा परिषद विभागात प्रथम आणि संपूर्ण राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.
Pune ZP
Pune ZPAgrowon
Published on
Updated on

Pune News: मुख्यमंत्री कार्यालयाने शासकीय कार्यालयांच्या सुधारणांसाठी १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यात पुणे जिल्हा परिषदेने ७५.२३ टक्के गुण मिळवीत, विभागात पहिला, तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. कार्यालयीन विविध सुधारणांवर भारतीय गुणवत्ता परिषदेकडून (क्यूसीआय) शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

विविध कार्यालयीने सुधारणांसाठी १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेच्या वतीने मूल्यमापन करण्यात आले. विविध कार्यालयीन सुधारणांमध्ये वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाने सुधारणांसाठीच्या उपाययोजना सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Pune ZP
Pune ZP Land Development: जिल्हा परिषदेच्या जागा होणार विकसित; ‘सीईओं’चा पुढाकार

यामध्ये पुणे जिल्हा परिषदेने पंतप्रधान घरकुलांचे ११५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. बचत गटांना कर्ज मंजुरीचे २१८ टक्के, लखपती दीदी १०९ टक्के, जलजीवन मिशन १०५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. तर नमो ड्रोन दीदी योजनेतून ५ महिलांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. कडुस (ता. खेड) येथे ५० लाख रुपये निधीतून गोबरधन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

याबरोबरच अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाबरोबरच नव्याने सेवेत आलेल्या ३२० अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, न्यायालयीने बाबींसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, ३६२ न्यायालयीन प्रकरणांमध्ये ३२१ प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. ९० विभागीय चौकशी प्रकरणांपैकी ८६ प्रकरणांचा निपटारा केला आहे. महिलांना उद्यमशील करण्यासाठी अमेरिकन इंडियन फाउंडेशन सोबत सामंज्यस्य करार करण्यात आला आहे.

Pune ZP
Pune ZP Budget: कृषी, समाजकल्याण, शिक्षणासाठी मोठी तरतूद; पुणे ‘झेडपी’चा २९२ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता!

तर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन, ते शास्त्रज्ञ होण्यासाठी आयुका, नासा आणि इस्रो सोबत शैक्षणिक सामंज्यस्य करार करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींच्या करआकारणी ऑनलाइन करण्यासाठी १० हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार आहे. अशा विविध प्रशासकीय सुधारणांसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास विभाग पहिल्या पाच विभागांमध्ये ६३.६८ टक्के मिळवून चौथ्या क्रमांकावर आला आहे. यात तर जिल्हा परिषदांच्या मूल्यांकनांमध्ये पुणे जिल्हा परिषद ७५ टक्के ४३ टक्के गुण मिळवून राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सर्व श्रेय जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना आहे. शासनाने दिलेली बहुतांश सर्व उद्दिष्टे आम्ही पूर्ण केली असून,भविष्यात क्रमांक एकवर येण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आरोग्य सेवा, स्मार्ट शिक्षण, आधुनिक शेती, पशुसंवर्धन, पर्यावरण आणि पर्यटनावर अधिक लक्ष्य केंद्रित करणार आहोत. यासाठी आदर्श पर्यावरण समृद्ध पर्यटन गावे विकसित करणार आहोत.
गजानन पाटील, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com