Pune Municipality : पुणे महापालिकेचा एसटी महामंडळाला अनधिकृत होर्डिंगप्रकरणी दंड

Unauthorized hoarding : मुंबईत होर्डिंग कोसळून १६ जनांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुण्यात होर्डिंग कोसळून दोघे जखमी झाले. यानंतर आता पुणे महापालिकेला खडबडून जाग आली आहे. सध्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जात आहे.
Pune Municipality
Pune MunicipalityAgrowon

Pune News : मुंबईतील घाटकोपरमध्ये सोमवारी (ता.१३) होर्डिंग कोसळून १६ जनांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे उदयपूर येथून अटक करण्यात आली असून आता राज्यभरात अनधिकृत होर्डिंगप्रकरणी मोहिम सुरू झाली आहे. याघटनेनंतर सर्वच महापालिकांना जाग आली असून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई सुरू झाली आहे. याचदरम्यान पुणे महापालिकेने एसटी महामंडळाला दणका दिला आहे. तर अनधिकृत होर्डिंगप्रकरणी दंड ठोठावला आहे.

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७४ जण जखमी झाले होते. ही घटना सोमवारी (ता.१३) घडली. तर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे घाटकोपरच्या छेडा नगर भागातील पेट्रोल पंपावर भला मोठा होर्डिंग पडला आणि ही भीषण घटना घडली. या घटनेत मृतांचा आकडा १६ वर पोहोचला आणि ७४ जण जखमी झाले.

Pune Municipality
Mumbai Municipality : मुंबईकरांना दिलासा!, येत्‍या पावसाळयापर्यंत मिळणार पाणी; महापालिकेचा निर्णय

यादरम्यान पुणे सोलापूर राज्य महामार्गावरील कवडीपाट टोल बुथजवळ देखील होर्डिंग पडून दोघे जखमी झाले. ही घटना गुलमोहर लॉनसमोर घडली. या अपघातात वरासाठी आणलेला घोड्यासह बँड पथकातील गाडीचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणीतीही गंभीर घटना घडली नाही.

यानंतर आता पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महापालिकेने अनधिकृत होर्डिंगप्रकरणी थेट एसटी महामंडळाला दंड ठोठावला आहे. हा दंड स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात लावण्यात आलेल्या तीन अनधिकृत होर्डिंगप्रकरणी ठोठावण्यात आला असून महापालिकेने दीड लाखाचा दंड केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com