
Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच क्रमांकाच्या दोन पावत्यांवर सेस (बाजार शुल्क) भरण्याचा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतरही, बाजार समिती सेस चोरी करणाऱ्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करू शकलेली नाही. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनदेखील या तक्रारीचा पाठपुरावा देखील बाजार समिती प्रशासन करत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
यामुळे कुंपणच शेत खात असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. तर आता सेस चोरी रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे प्रशासन सांगत असले तरी, सेस चोरी खरच बंद होणार का, अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
बाजार आवारात वर्षानुवर्षे शेतीमालाची नोंद न करता, सेस चोरीचे रॅकेट सक्रिय आहे. याबाबत लेखापरीक्षण अहवालात देखील गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. असे असताना देखील बाजार समिती प्रशासनाला सेस चोरी रोखण्यात अपयश आले आहे.
बाजार समितीच्या सेस (बाजार शुल्क) हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तर प्रत्येक शेतीमालाची १०० टक्के नोंद प्रवेशद्वारावर करून, त्याच्या खरेदी विक्रीवर सेस आकारला जातो. असा कायदा आहे. मात्र वर्षानुवर्षे बाजार आवारातील विविध संघटनांचे ‘दलाल’ नेते आणि प्रशासनाच्या संगनमताने सेस चोरीचे रॅकेट सक्रिय आहे, हे समोर येत आहे. प्रवेशद्वारावरील एजन्सीची आणि समितीच्या आवक नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे.
तसेच, स्टर्लिंग सिस्टीम या संगणक प्रणालीमधील काही शेतीमालाची आवक व प्रत्यक्षात दर्शविलेल्या आवकेमध्येही मोठी तफावत असल्याचे उघड झाले आहे. सेस चोरी प्रकरणात संचालक मंडळाच्या रडारवर आता आता थेट विभागप्रमुख आले आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.