Mumbai Market Cess Scam: बाजार समिती प्रशासनच सेस चोरीला जबाबदार

Mumbai Market Fraud: मुंबई बाजार समितीत कर्मचारी आणि वाहतूकदारांच्या संगनमताने बाजार शुल्क (सेस) चोरी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. व्यापारी संघटनेने प्रशासनाला पत्र देऊन डिजिटल पेमेंट प्रणाली लागू करण्याची मागणी केली आहे.
Mumbai APMC
Mumbai APMCAgrowon
Published on
Updated on

Pune News: मुंबई बाजार समितीमधील कर्मचारी आणि वाहतूकदार यांच्या संगनमताने प्रवेशद्वारावर बाजार शुल्क (सेस) चोरी सुरू झाली आहे, असे पत्र दि फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट्‌स असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला देत, आम्हीच सेस चोरीच्या गाड्या पकडून, प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, असे सांगत सेस संकलनासाठी डिजिटल पेमेंटचा प्रस्ताव बाजार समितीला दिला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

‘मुंबई बाजार समितीमधील सेस चोरीवर शिक्कामोर्तब’ या मथळ्याखाली ‘ॲग्रोवन’मधून बुधवारी (ता. २) वृत्त प्रसिद्ध झाल्यावर, व्यापारी संघटनेने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. याबाबतचे तातडीने पत्र संघटनेने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. पत्रात म्हटले आहे, की पणन कायद्यानुसार बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्नाचे वजन किंवा मोजणी करण्यात आल्यानंतर निश्‍चित करण्यात आलेली बाजार फी, ताबडतोब भरणे हे खरेदीदार, अडते, प्रक्रियाकार आणि व्यापारी यांचे कर्तव्य आहे.

Mumbai APMC
Mumbai Market Cess Scam: मुंबई बाजार समितीत शेकडो कोटींची सेस चोरी – चौकशी अहवालात धक्कादायक निष्कर्ष!

या कायद्यानुसार नागपूर बाजार समितीमध्ये संपूर्ण सेस वसुली ही प्रवेशद्वारावर होते. त्याच बाजार समितीने कायद्यानुसार फळ बाजार येथे २००२ पासून थेट खरेदीदारांकडून सेस वसुली पद्धत सुरू केली आहे, त्यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
हीच पद्धत मुंबई बाजार समितीमध्ये सुरू असून, कालांतराने बाजार समिती कर्मचारी व वाहतूकदार यांच्या संगनमताने गेटवर सेस चोरी सुरू झाली.

Mumbai APMC
Market Committee Cess Scam: मामला सेस चोरीचा!

ही बाब बाजार समितीमधील अडते, व्यापारी यांनीच बाजार समितीच्या निदर्शनास आणून दिली. ही गेटवरची सेस चोरी थांबविण्यासाठी डिजिटल पेमेंटचा प्रस्ताव व्यापाऱ्यांनीच बाजार समितीला दिला असून, याद्वारे सेस थेट बाजार समितीच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे बाजार समितीचा सेस बुडणार नाही. एखादा व्यापारी सेस कमी भरत असेल, तर त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. शेतीमालाची आवक-जावक किती झाली याची त्वरित माहिती मिळणार आहे. त्यामुळे डिजिटल पेमेंटची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

सेस चोरीचे प्रकरण एकमेकांवर ढकलण्यात काही अर्थ नाही. हे सगळे वर्षानुवर्षे प्रशासन आणि व्यापारी यांच्या संगनमताने सुरू आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होऊन, नक्की चोर कोण आहे, हे पोलिसांनी आणि पणन विभागाने समोर आणावे.
राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com