Pune Agriculture Finance Scheme: चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी पुणे जिल्ह्याचा ४ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्ज (किसान क्रेडिट कार्ड) योजनेसाठी ७,३०० कोटी रुपये, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासाठी ९५,५०० कोटी रुपये, तर शेतीपूरक उद्योगांसाठी १५,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे..जिल्हाधिकारी तथा जिल्हा सल्लागार समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समितीच्या संयुक्त बैठकीत या आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीस ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे उपमहाव्यवस्थापक तथा जिल्हा सल्लागार समितीचे संयोजक आलोक कुमार मिश्रा, रिझर्व्ह बँकेचे प्रमुख जिल्हा अधिकारी आकर्षण अविनाश, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक पीयूष खातखेडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक जयानंद भारती, विविध बँकांचे प्रतिनिधी आणि शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Farm Loan Waiver: पुणे जिल्ह्यात ३.१५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.डुडी यांनी सांगितले, की मागील आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्याने वार्षिक पतपुरवठा आराखड्याच्या उद्दिष्टाच्या ११६ टक्के पूर्तता केली. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बचत गटांना ५१४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. ‘उमेद’ अभियानांतर्गत बचत गटांच्या कर्जाची थकबाकी एक टक्क्यापेक्षा कमी राखण्यात आल्याबद्दल त्यांनी संबंधित विभागाचे कौतुक केले..नाबार्ड, अग्रणी बँक, भारतीय रिझर्व्ह बँक आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून पतपुरवठा आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार विविध क्षेत्रांसाठी बँकांना कर्जवाटपाची उद्दिष्टे निश्चित करण्यात येतात. बैठकीत जिल्ह्यातील बँकांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला..Crop Loan Distribution: खरीप पीककर्ज वितरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड .केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व बँकांनी समन्वयाने काम करावे, तसेच रोजगारनिर्मितीशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश डुडी यांनी दिले. उद्दिष्टपूर्तीत मागे राहणाऱ्या बँकांचा शाखा आणि क्षेत्रीय व्यवस्थापकांच्या उपस्थितीत दरमहा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले..या वेळी तळेगाव दाभाडे, थेऊर आणि हडपसर येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थांमध्ये युवकांना मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती देण्यात आली. तसेच पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या पीककर्ज मेळाव्यांमध्ये बँकांनी सक्रिय सहभाग घेऊन शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले..पतपुरवठा आराखड्यामुळे शेती, उद्योग, स्वयंरोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. बँका आणि शासकीय विभागांनी समन्वयाने काम करून योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवावा.जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, पुणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.