Pune APMC : पुणे बाजार समितीला हवा विमानतळाचा कनेक्ट

APMC Facility : पायाभूत सुविधांवरील ताण, सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी, व्यापारासाठी कमी पडत असलेली जागा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत पुणे बाजार समितीमध्ये व्यापार सुरू आहे.
Agriculture Export
Agriculture ExportAgrowon

Pune News : पायाभूत सुविधांवरील ताण, सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी, व्यापारासाठी कमी पडत असलेली जागा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत पुणे बाजार समितीमध्ये व्यापार सुरू आहे. अपुऱ्या जागेमुळे पुणेकरांना जीवनावश्यक बाबी पुरविण्यात अडथळा निर्माण होत आहे.

त्यामुळे वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता अत्याधुनिक बाजार आवार निर्माण करावे, त्यासाठी रिंगरोडवर विमानतळाला कनेक्ट असलेली २०० एकरहून अधिक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड (Shree Chhatrapati Shivaji Market Yard) अडते असोसिएशनने केली आहे.

मार्केड यार्डमधील व्यापाऱ्यांच्या समस्या आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करत कामकाजाची माहिती देण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सकाळ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध (बापू) भोसले, सचिव करण जाधव, खजिनदार तात्यासाहेब कोंडे, उपाध्यक्ष गणेश शेडगे, संचालक प्रशांत बांदल आणि फिरोज साचे या वेळी उपस्थित होते. ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार आणि ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

Agriculture Export
Pune APMC : कमी दराबाबत जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण

जागा अपुरी पडत असल्याने मुंबर्इतील वाशी बाजार समिती स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यानुसार पुण्यातील बाजार आवार स्थलांतरित करावे. तेथे सर्व पायाभूत सुविधांसह शेतीमाल साठवणूक आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक सुविधा आणि व्यापारासाठी आवश्यक बाबी उपलब्ध करून द्याव्यात.

तसे झाल्यास बाजार आवारातील गर्दी कमी होर्इल. व्यापारवाढीस मदत मिळेल. कोल्ड स्टोअरेज, लोडिंग अनलोडिंग सुविधा, पार्किंग, स्वच्छतागृह, ऑफिस स्पेस, मोठे गाळे उपलब्ध होतील, अशी आशा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या वेळी आदिनाथ चव्हाण यांनी भविष्यातील बाजारपेठेचा वेध घेत व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.

Agriculture Export
Pune APMC : पुणे बाजार समितीला मिळाले सेसद्वारे ६८.४० कोटींचे उत्पन्न

असोसिएशनने केलेल्या मागण्या

- लोडिंग-अनलोडिंगसह वाहतूक, कोल्ड स्टोअरेज अशा अद्ययावत सुविधा द्याव्यात

- थेऊरच्या कारखान्याची जागा बाजार समितीने घ्यावी

- शेतीमाल निर्यातीसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

- मार्केटमध्ये पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात

- पुण्याजवळ वाशीसारखे मोठे मार्केट निर्माण करावे

नियमनमुक्ती कायदा रद्द केला तरच व्यापारी टिकू शकतात. नाही तर भविष्यात अडते टिकणार नाहीत. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी खासगी बाजार सुरू केले तर त्या कंपन्या ठरवतील तोच भाव शेतकऱ्यांच्या मालाला मिळेल. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बाजार समित्या टिकणे गरजेचे आहे. बाजारपेठ स्थलांतरित झाल्यास शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करणे सोपे होर्इल. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
- अनिरुद्ध भोसले, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन
खासगी बाजारपेठ सुरू करण्यात अनेक अडचणी आहेत. राष्ट्रीय बाजार निर्माण करण्यासाठी दिव्याजवळ ५०० एकर जागा देण्याचा प्रस्ताव होता. मात्र तोदेखील पूर्णत्वास गेला नाही. पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच बाजार समितीने छोट्या-छोट्या जागा घेण्याऐवजी शहरालगत एकाच ठिकाणी मोठी जागा घ्यावी.
- करण जाधव, सचिव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com