Pulses Sowing : मुरूड तालुक्यात कडधान्य पेरणीची लगबग सुरू

Rabi Season : यंदा शेतकऱ्यांनी सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रात सुवर्णा, रूपाली, शुभांगी, कर्जत, चिंटु, साई, जया आदीसह भातपिकांची लागवड केली आहे, तर सुधारित वाणाची २०० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Murud News : तालुक्यातील भातकापणीची कामे ७० ते ८० टक्के पूर्ण झाली आहेत, तर थंडी पडायला सुरुवात झाल्याने कडधान्यासाठी जमीन नांगरणी सुरू झाली आहे. कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीसाठी शेतकरी व्यग्र झाला आहे.

मुरूड तालुक्यात ३२०० हेक्टर क्षेत्राव भातपीक घेतले जाते. यंदा शेतकऱ्यांनी सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रात सुवर्णा, रूपाली, शुभांगी, कर्जत, चिंटु, साई, जया आदीसह भातपिकांची लागवड केली आहे, तर सुधारित वाणाची २०० हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली आहे. यावर्षी वरुणराजाच्या कृपादुष्टीमुळे तालुक्‍यात अधिक पर्जन्याची नोंद झाली.

Rabi Sowing
Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला गती

त्यामुळे शेतीसाठी समाधानकारक पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पीक बहरल्याचे दिसून येत आहे. शेतकरीवर्गाकडून भातकापणीला वेग आला असून सुमारे ८० टक्के कापणी पूर्ण झाली आहे. उखारु जमिनीवरील हळव्या भाताची कापणी, झोडणीची कामे पूर्ण झाली आहेत, तर खारपट्ट्यासह खोलगट भागातील गरवे भातकापणीला गेल्या आठ दिवसांपूर्वीच जोरदार सुरुवात झाली आहे.

त्‍यामुळे भातकापणी जवळजवळ अंतिम टप्प्यावर आली आहे, तसेच तालुक्‍यामध्ये थंडी पडू लागल्याने कडधान्यासाठी पोषण असे वातावरण तयार झाले आहे. त्‍यामुळे कडधान्याच्‍या पिकासाठी शेतकरीवर्गाकडून जमिनीची नांगरणी करण्यात येत आहे. भातकापणीनंतर कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीसाठी अनेक शेतकरी व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. भाताबरोबर कडधान्य पिकांना मोठी मागणी असते.

Rabi Sowing
Rabi Sowing : मराठवाड्यात ६ लाख ८१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

शिवाय या पिकांमधून शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळतात. त्‍यामुळे भाताचे पीक घेतल्यानंतर अनेक शेतकरी कडधान्य पिकांकडे वळतात. यंदाही कडधान्य पिकासाठी लगबग दिसून येत आहे. सध्या शेतीच्‍या कामांना मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. पूर्वी आजूबाजूच्‍या खेडेगावातील मजूर शेतीच्‍या कामासाठी सहज उपलब्ध होत होते, मात्र तरुण पिढी याकडे दुर्लक्ष करत आहे.

पीकविमा काढण्याबाबत उदासीन

यापूर्वी भातविक्रीसाठी रोहा तालुक्यामध्ये जावे लागत होते, मात्र चार वर्षांपासून मुरूड तालुक्यात पणन विभागातर्फे भात खरेदी केंद्राची स्‍थापना करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिक्विंटल भाताला २०४० रुपये इतका हमीभाव देण्यात येत आहे.

त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीला आता चाप बसला आहे, मात्र दुसरीकडे प्रधानमंत्री पीक विमा काढण्यास रायगड जिल्‍ह्यातील शेतकरी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. केवळ १७७७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याची माहिती कृषी कार्यालयाने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com