Collector Jitendra Dudi: नागरिकांचे मूलभूत प्रश्‍न सोडवा

Baramati Development: रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोमवारी (ता. १४) दिले.
Public Grievance
Public GrievanceAgrowon
Published on
Updated on

Pune News: रस्ते, भूसंपादन मोबदला, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई, पाणीपुरवठा योजना, शेतरस्ते, सिंचनासाठी पाणी आदी मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी संबंधित विभागांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सोमवारी (ता. १४) दिले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी जिल्ह्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Public Grievance
Tribal Village Development: कृती आराखड्याद्वारे राज्यातील ४९६५ गावे स्वयंपूर्ण करणार : मंत्री उईके

पुणे बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने नागरिकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा यादृष्टीने २०१३च्या भूमिसंपादन कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. ही मोबदल्याची प्रकरणे गतीने निकाली निघतील यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

हवेली, मुळशी, वेल्हा आदी तालुक्यांतील दरडग्रस्त व नैसर्गिक आपत्तीग्रस्त गावे, वस्त्या, पाड्यांचे भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण विभागाच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले असून आवश्यक तेथे पुनर्वसन, अन्य उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Public Grievance
Collector Jitendra Dudi: प्रस्तावित कामे ३१ जुलैच्या आत सुरू करा : जिल्हाधिकारी

तसेच हवेली तालुक्यातील जांभले या खडकवासला धरणाच्या पाणलोटक्षेत्रात असलेल्या गावातील नागरिकांना व शालेय मुलांना प्रवासासाठी बोट मिळावी या मागणीच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाहीचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.कातकरी कुटुंबांना जागा देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आलेल्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी माहिती दिली. जिल्ह्यात ९ हजार २०० कातकरी कुटुंबे असून, डिसेंबरपर्यंत केवळ १६ कुटुंबांकडे घरे होती.

गेल्या सहा महिन्यांत मोहीम स्तरावर काम करून ९५० कातकरी कुटुंबांना जागा देण्यात आली असून त्यांना घरकुले, नियमानुसार सोईसुविधांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. उर्वरित सर्व कातकरी कुटुंबांना येत्या ऑक्टोबरपर्यंत जमीन देण्याचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Public Grievance
Public Welfare Scheme : शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी

नियोजनबद्ध विसर्ग करा

यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणात अधिकचा पाणीसाठा न ठेवता नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन राबविण्यात आल्यामुळे मोठ्या पावसानंतरही पूरस्थिती निर्माण झाली नाही, याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

इंदापूर तालुक्यातील नागरिकांच्या खडकवासला कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती तपासून पाटबंधारे विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील. इंदापूर तालुक्यातील शेत रस्त्यांच्या मागणीबाबतची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या अनुषंगाने लवकरात लवकर शिबिर घेऊन कार्यवाही करण्यात येईल. 

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश

कालठण इत्यादी गावात बंदी असलेले मांगूर मासे पालनाबाबत गुन्हे दाखल करा.

२०१९-२० मध्ये झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाईच्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. 

दौंड शहरातील घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया आदींबाबत गांभिर्याने प्रयत्न करावे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील जलप्रदूषण, वायुप्रदूषणाच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.

अतिवृष्टीमुळे कऱ्हा नदीवरील वाहून गेलेल्या ठिकाणी नवीन बंधारे बांधणे, दुरुस्ती करणे.

बारामती तालुक्यातील जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादन मोबदल्यासाठी कार्यवाही करावी.

मुळशी, वेल्हा, मावळ आदी तालुक्यांतील पर्यटनस्थळांच्या विकासाचा आराखड्याच्या अंमलबजावणीला गती द्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com