Italy Farmers Protest : संपूर्ण युरोपमध्ये सरकारी धोरणांविरोधात संतप्त शेतकरी महिना-दीड महिन्यापासून रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर मोर्चा, रास्ता रोको आदी आंदोलने करीत आहेत. युरोपातील अनेक देशांत शेतकरी आंदोलने सुरूच आहेत.
इटलीतील आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले असून, आंदोलक शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. १५) राजधानी रोममध्ये प्रवेश करत तेथील प्राचीन सर्कस मॅक्सिमसवर हल्लाबोल केला. सर्कस मॅक्सिसमभोवती शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली या वेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली.
शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह रोममध्ये प्रवेश केल्यानंतर शेतकऱ्यांचा एक गट पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यंच्या कार्यालयाजवळ जमा झाला होता. पुढे युरोपीय संघाच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवत शेतकऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांना आपल्या मागण्या तसेच सरकारी धोरणाविरोधात तक्रारीचे निवेदन दिले.
युरोपात वेगाने बदलणारे हवामान पाहता युरोपीय संघाने कायद्यांमध्ये अनेक बदल केले. त्याबरोबरच युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये महागाई मोठ्या प्रणाणात वाढली आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे तर दुसरीकडे महागाई वाढली आहे. इंधनांच्या किमतींपासून ते हवामानात होणारे बदल कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या युरोपीय संघाच्या कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हवामान बदलाच्या नियमांपासून शेतकऱ्यांना दूर ठेवावे तसेच शेतीमध्ये कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालू नये या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी युरोपातील सुमारे १० देशांतील शेतकरी रस्त्यावर उतरून विविध प्रकारे आंदोलने करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.