Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलकांना सीमेवरच रोखले

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यास निघालेले रविकांत तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना खालापूर पोलिसांनी मुंबईच्या सीमेवरच रोखले. सरकारवर आंदोलन दडपल्याचा आरोप करत तुपकरांनी आता राज्यभर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Buldana News: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापूस उत्पादकांना भावफरक व इतर अनेक मागण्यांसाठी बुधवारी (ता. १९) मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले रविकांत तुपकर व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलन रोखले. यानंतर तुपकर यांनी सरकारवर आंदोलन दडपल्याचा आरोप करीत यापेक्षाही राज्यभर आता मोठे आंदोलन उभारू, असा इशारा खालापूर पोलिस ठाण्यात माध्यमांशी बोलताना दिला.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar: कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी मुंबईत मोर्चा: रविकांत तुपकर

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सर्व आंदोलक मंगळवारी (ता. १८) मुंबईकडे निघाले होते. रात्री मुंबईच्या वेशीवर नढाळ गावात सर्वांनी मुक्काम केला. बुधवारी (ता. १९) सकाळी आंदोलनासाठी मुंबईकडे आंदोलक निघण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अडवले. खालापूर (जि. रायगड) पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक करीत ठाण्यात नेले. तर उर्वरित आंदोलकांना त्याच ठिकाणी स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar: शेतकरीप्रश्‍नी रस्त्यावरची लढाई लढणार : रविकांत तुपकर

मंगळवारी मुंबईकडे निघालेले आंदोलक नढाळ गावात श्री क्षेत्र पंचायतन मंदिरात मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. आंदोलक व पोलिसांत संघर्षाची स्थिती बनली. पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेऊन मुक्कामाच्या ठिकाणावरून दुसरीकडे हलवले तर उर्वरित आंदोलकांना स्थानबद्ध केले.

सरकारच्या इशाऱ्यावर पोलिसांनी आंदोलन दडपून काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुंबईकडे निघालो असताना मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त केला. या ठिकाणी आंदोलक व पोलिसांत संघर्ष झाला. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लक्ष वेधण्यासाठी मुंबईत येत होतो. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमुक्ती देऊ असे आश्‍वासन निवडणुकीत दिले होते. त्यावर आता बोलत नाहीत. सोयाबीन-कापसाला भाव नाही, शेतीला कुंपण द्यायला हवे होते, पण सरकार काहीही करीत नाही. आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही केली जात आहे. हे सरकार शेतकऱ्यांना घाबरले आहे. उलट त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती. राज्यात याहीपेक्षा मोठे आंदोलन उभे करू.
रविकांत तुपकर, शेतकरी नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com