Orange Market News : अमरावतीत संत्रा मोफत वाटून शासकीय धोरणांचा निषेध

Orange Import Duty : बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्याच्या परिणामी निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारात संत्र्यांचे दर गडगडले.
Orange Market
Orange MarketAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्याच्या परिणामी निर्यात ठप्प झाल्याने देशांतर्गत बाजारात संत्र्यांचे दर गडगडले. आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार शेतकरी आघाडीच्या वतीने याविरोधात सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी सोमवारी (ता. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून न घेतल्याचा आरोप करण्यात आला. परिणामी आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या विरोधातच आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. गेल्या हंगामात भारत सरकारने ऐनवेळी कांदा निर्यात बंद केली. त्यामुळे बांगलादेश सीमेवरून कांदा परत बोलावण्यात आला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचाच राग मनात धरत बांगलादेश सरकारने संत्र्याच्या आयात शुल्कात सातत्याने वाढीचे धोरण अवलंबिल्याचा आरोप आहे. बांगलादेश हा नागपुरी संत्र्यांचा एकमेव आयातदार देश आहे. आंबिया बहारातील संत्रा फळांची दररोज १०० टनांपेक्षा अधिक निर्यात बांगलादेशमध्ये होते. आता प्रतिकिलो ८८ रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याने ती ठप्प झाली आहे.

Orange Market
Orange Export : संत्रा निर्यातीतील अडसर दूर करावा

परिणामी देशांतर्गत बाजारात संत्रा १५ ते २० रुपये किलोवर आला आहे. या प्रकरणात राज्य व केंद्र शासनाने हस्तक्षेप करावा. साखरेच्या धर्तीवर संत्र्यावर निर्यात अनुदान सवलत द्यावी, अशी मागणी आहे.

परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने सोमवारी प्रहार जनशक्‍ती पक्षाच्या शेतकरी आघाडीचे जिल्हा प्रमुख मंगेश देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

Orange Market
Orange Export : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात संत्री फेकून 'प्रहार'चे आंदोलन

या वेळी शेतकऱ्यांनी दोन क्रेट संत्रा फळे आणली होती. जिल्हाधिकारी कटियार यांनी ही फळे व निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवावे, असे आंदोलकांना अपेक्षित होते. परंतु श्री. कटियार यांनी त्यास नकार दिला.

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यातच फळे टाकण्यात आली व त्यानंतर ती जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना मोफत वितरित करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांप्रति असलेल्या भूमिकेचा या वेळी निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधातच आता विभागीय आयुक्‍त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

वातावरण बदलामुळे ८० टक्‍के फळे गळाली. उर्वरित २० टक्‍के फळांना दर नाही. त्यामुळे साखरेच्या धर्तीवर निर्यात अनुदानाची मागणी आहे. सरसकट भरपाईदेखील द्यावी. बांगलादेशच्या आयात शुल्क प्रकरणात तोडगा काढण्याची गरज आहे.
- मंगेश देशमुख, प्रहार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com