Maharashtra Land Dispute : तळेगावच्या ‘त्या’ जमिनींवर वक्फ बोर्डाचा दावा नाही; शेतकऱ्यांना दिलासा

Farmers Rights : एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल केल्यामुळे बोर्डाने अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे.
Farmers
FarmersAgrowon
Published on
Updated on

Latur News : एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल केल्यामुळे बोर्डाने अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे चिंतित असलेल्या शेतकऱ्यांशी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी व औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी (ता. २५) तळेगाव येथे जाऊन संवाद साधला.

या प्रकरणातील जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नसल्याने बोर्डाने शेतकऱ्यांच्या जमिनींवर कोणताही हक्क सांगितलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्‍चित राहावे, असे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष काझी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा दिलासा सहकारमंत्री पाटील व आमदार पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

Farmers
Land Dispute : गुंता वारस नसलेल्या जमिनीचा!

नोटिसा बजावलेल्या जमिनीची नोंद गॅझेटनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदीमध्ये नसल्याने वक्फ बोर्डाने दावा करण्याचा प्रश्‍नच उद्‍भवत नाही. तरीही शेतकऱ्यांमध्ये वक्फ बोर्डाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने गावामध्ये शेतकऱ्यांसमोर भूमिका मांडण्यासाठी आलो असल्याचे काझी यांनी या वेळी स्पष्ट केले.

Farmers
Waqf Board : वक्फ बोर्डाचा कारनामा! देशात बळकावल्या ९९४ मालमत्ता; बोर्डाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर

तसेच या प्रकरणात शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दडपणाखाली न राहता निश्‍चित व्हावे, असे सहकारमंत्री पाटील म्हणाले.

औसा तालुक्यातील बुधोडा येथील शेतकऱ्यांनाही अशाच नोटिसा आल्या आहेत. तळेगाव आणि बुधोडा येथील शेतकऱ्यांना या प्रकरणात सर्व सहकार्य करण्यात येणार असून त्यांच्या जमिनी त्यांच्याच मालकीच्या राहतील, असा विश्‍वास आमदार पवार यांनी दिला. सुरुवातीला तळेगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य रमेश दापके व उपसरपंच ज्ञानेश्‍वर शेळके यांनी शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसांबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला अध्यक्ष काझी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com