Property Card: प्रॉपर्टी कार्ड नोंदीसाठी करता येणार घरबसल्या ऑनलाइन अर्ज 

Land Records: भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी गेल्या काही दिवसांपासून कामकाजात वेगाने बदल केले जात आहेत.
Property Card
Property CardAgrowon
Published on
Updated on

Pune News: भूमी अभिलेख विभागाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी गेल्या काही दिवसांपासून कामकाजात वेगाने बदल केले जात आहेत. प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिकेवरील खरेदी नोंदी, वारसनोंदीसाठी भूमी अभिलेख विभागाने ईप्सित संगणक प्रणाली लागू केली आहे. यामुळे नागरिकांना या नोंदीसाठी आता नगर भूमापन कार्यालयात अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात न जाता घरसबल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने सात-बारा उताऱ्यावरील वारसनोंद, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आदींसाठी ई-हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या या नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता त्याच धर्तीवर ईप्सित म्हणजेच इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणक प्रणाली तयार केली असून भूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Property Card
Property Cards Distribution PM Modi : ६५ लाखांहून अधिक संपत्ती कार्डचं वितरण; मोदींची कॉँग्रेसवर टिका

भूमिअभिलेखचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या वाड्या आणि गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमिअभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये यापूर्वीच सर्व मिळकतींची प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आली आहेत. राज्यात सुमारे ९१ लाख मिळकतींची प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आली आहेत.

Property Card
Property Card Distribution : पुणे विभागातील ६.२५ लाख प्रॉपर्टी कार्ड्सचे लवकरच वितरण!

यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार

प्रॉपर्टी कार्डवरील वारसनोंदीसह खरेदी नोंदीसाठी, बक्षीसपत्र नोंदी, गहाणखत, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे आणि हक्कसोड पत्रानुसार नोंदी करणे आदींसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

...अशी आहे प्रक्रिया

विभागाच्या https://epsit.mahabhumi.gov.in/संकेतस्थळावर नागरिकांनी प्रॉपर्टी कार्डवरील फेरफारसाठी सर्वप्रथम ईप्सित प्रणालीमध्ये स्वतःचा मोबाइल नंबर टाकून स्वतःचे लॉगिन तयार करावे, इतरांच्या लॉगिनमधून अर्ज करता येणार नसल्याचे भूमी अभिलेख विभागाने म्हटले आहे.

ईप्सित प्रणालीमध्ये नागरिकांनी अर्जाच्या सर्व टॅबमध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज फेरफार नोंद घेण्यासाठी सेंड या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्ज सबमिट होईल. तसेच नागरिकांना अर्जाची सद्यःस्थिती त्यांच्या लॉगिनमध्ये पाहता येईल. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींसाठी हेल्पलाइन नंबर - ०२०२५७१२७१२ वर संपर्क साधावा, असे आवाहन भूमिअभिलेख विभागाने केले आहे.

प्रॉपर्टी कार्डवरील वारसनोंद खरेदी खतानुसार नोंदी घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अर्जाची सद्यःस्थितीही नागरिकांना समजणार आहे.
डॉ. सुहास दिवसे,  आयुक्त, जमाबंदी विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com