Water Management
Water ManagementAgrowon

Water Management : पाऊस पाण्याचे योग्य नियोजन

कोकण (महाराष्ट्र), ओडिशा, छत्तीसगड इत्यादी खात्रीशीर पावसाच्या प्रदेशात सुद्धा, शेतात एका बाजूस खड्डा घेऊन त्यात पाणी साठवण्याची पद्धत अस्तित्वात आहे.
Published on

आपणा सर्वांना हे माहीत आहे, की खरीप हंगामात (Kharif Season) दरवर्षी पाऊस (Rain) कधी सुरू होणार आहे, किती पडेल, हे काही निश्‍चित समजत नाही. जी माहिती विविध यंत्रणा किंवा हवामान खात्याकडून (Weather Department) (आयएमडी) मिळत असते ते सर्व अंदाज असतात. खात्रीशीर असे काहीच नसते. असे असले तरी काही, किमान नियोजन प्रत्येक शेतकरी निश्‍चितच करू शकतात. ते म्हणजे बांधबंदिस्तीची कामे. अशी कामे पूर्वी शेतकरी करीत असत, आताही करतात.

Water Management
Dam Water : हतनूर, गिरणातून पाण्याचा विसर्ग कायम

एवढेच की हे सर्व सार्वत्रिक होताना दिसत नाही. पाऊस वेळी-अवेळी, कमी-अधिक पडत असल्याने, पडणाऱ्या पावसाचे जमिनीत जिरवण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच अति पाऊस असल्यास शेतातून पाणी बाहेर काढणे आवश्यक आहे. पण हाच पडणारा पाऊस किमान आवश्यकता एवढा आपल्या शेतात, जिरवून उरलेल्या अपधावाचे पाणी शेतात एका बाजूस खड्डा घेऊन त्यात सामावून घेतले तर पावसाच्या खंड कालावधीत, हेच अति पावसाच्या काळात संग्रहित केलेले पाणी पिकास संरक्षित ओलीत करण्यास कामात येते.

Water Management
Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

शेतात पाणी जिरविणे किंवा शेतातील पाण्याचा निचरा होणे हे लागवड पद्धतीवर सुद्धा पुष्कळ अवलंबून आहे. यासाठी विशेषतः सरी वरंबा पद्धत किंवा रुंद वरंबा सरी पद्धत, पीक पद्धतीनुसार त्या लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. या दोन्ही पद्धतीचा फायदा हा आहे, की अति पाऊस असल्यास, सरीतून पाण्याचा निचरा होऊन शेतातील पाणी शेततळ्यात साचविता येते. आणि पाऊस कमी पडला तरी पाणी गादीवाफ्यावर चांगले जिरत असल्याने, या कमी ओलितावर पिके चांगली तग धरून राहू शकतात. शिवाय गादीवाफ्यामुळे, माती भुसभुशीत असल्याने, मुळांची वाढ चांगली होते. मुळांची संख्या चांगली भरपूर असल्यास आणि वाढ चांगली झाल्याने पिके कमी पाण्यावर तग धरून राहण्यास मदत होते.

कोकण (महाराष्ट्र), ओडिशा, छत्तीसगड इत्यादी खात्रीशीर पावसाच्या प्रदेशात सुद्धा, शेतात एका बाजूस खड्डा घेऊन त्यात पाणी साठवण्याची पद्धत अस्तित्वात आहे. ही तयारी मे महिन्यात गावातील शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून, आपापल्या शेतात केल्यास कुठे पाणी तुंबून राहण्याचा प्रश्‍नच येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com