Fruit Orchard Management : फळबाग लागवडीसाठी खड्डा भरण्याची योग्य पद्धत

Orchard Planting : नवीन फळझाडांच्या लागवडीच्या नियोजित जागी योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत.
Fruit Orchard
Fruit OrchardAgrowon

Proper Method of Fruit Orchard management : नवीन फळझाडांच्या लागवडीच्या नियोजित जागी योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत. जमिनीचा मगदूर आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्यांचा आकार ठरवावा. हलक्या जमिनीत व मोठ्या विस्ताराच्या झाडासाठी मोठ्या आकाराचे खड्डे घ्यावेत. दीर्घायुषी झाडे असतील तर १ मी. × १ मी. × १ मी. आकाराचा खड्डा घ्यावा.

मध्यम आकाराच्या झाडांना ७५ × ७५ × ७५ सेंमी आणि लहान झाडांना ६० × ६० × ६० सेंमी आकाराचे खड्डा घ्यावा. जमीन डोंगर उताराची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी. खात्रीशीर पाऊस झाल्यानंतरच फळझाडांच्या लागवडीचे नियोजन करावे.

Fruit Orchard
Fruit Orchard Management : उन्हाळ्यात फळबागांची काळजी कशी घ्यावी

फळबागेसाठी खड्डे भरणे

खड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे काढल्यानंतर ते तीन आठवडे उन्हामध्ये चांगले तापू द्यावेत. जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे पुन्हा भरावे.

खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा १५ सें.मी. थरात भरावा. पोयटा माती, मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत २० ते २५ किलो अधिक गांडूळ खत २ ते ३ किलो अधिक निंबोळी पेंड २ ते ३ किलो अधिक टायकोडर्मा जिवाणू २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू १५ ग्रॅम अधिक ॲझेटोबॅक्टर २५ ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करून घ्यावे. या मिश्रणाने खड्डा जमिनीच्या वर ५ ते ७ सेंमी उंच भरून घ्यावा. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला फळझाडांची लागवड करता येईल.

Fruit Orchard
Fruit Orchard : दुष्काळामुळे राज्याच्या फळबाग लागवडीत घट

लागवडीची योग्य वेळ

खात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करावी. अति पावसात किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाडांची लागवड करू नये.

पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेल्या फळझाडांची चांगली समाधानकारक वाढ होते. ही लागवड काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात. जून-जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते. लागवडीसाठी खात्रीशीर रोपवाटिकेतून कलमे किंवा रोपांची खरेदी करावी.

विविध फळझाडांच्या लागवडीचे अंतर

फळझाड लागवडीचे अंतर (मीटर) हेक्टरी झाडे

आंबा १० × १० १००

चिकू १० × १० १००

चिंच १० × १० १००

जांभूळ १० × १० १००

नारळ ७.५ × ७.५ १७७

आवळा ७ x ७ २०४

पेरू ६ × ६ २७७

३ × २ १६६६

बोर ६ × ६ २७७

लिंबू किंवा मोसंबी ६ × ६ २७७

सीताफळ ५ × ५ ४००

डाळिंब ४.५ × ३ ७४०

अंजीर ५ × ५ ४००

४.५ × ३ ७४०

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(मृदा शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com