Bihar News : देशभरात शेतकऱ्यांच्या अनेक संस्था स्थापन होतात; मात्र काही दिवसांनी त्या बंद होतात, असे देशभर चित्र आहे. मात्र मूळ उद्देश स्पष्ट नसल्याने त्याचा शेती समूहास कुठलाही फायदा झालेला नाही. हे चित्र आता बदलायचे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांची नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रशिक्षणातून प्रगती शक्य आहे, असा आशावाद बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केला.
‘सहकार भारती’ या संस्थेच्या शेतकरी उत्पादक कंपनी प्रकोष्ठ आयोजित पहिल्या दोन दिवसीय ‘एफपीओ’ राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवारी (ता. २५) पाटणा (बिहार) येथील ऊर्जा ऑडिटोरियम येथे समारोप झाला. या वेळी श्री. आर्लेकर बोलत आहे. व्यासपीठावर सिक्कीमचे माजी राज्यपाल गंगा प्रसाद, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकूर, राष्ट्रीय सरचिटणीस उदय जोशी, राष्ट्रीय संघटन सचिव संजय पाचपोर, बिहार सहकार भारतीच्या सरचिटणीस शशिबाला रावल आदी उपस्थित होते.
श्री. आर्लेकर म्हणाले, की आजवर काहींनी सहकार बदनाम केला. मात्र याच सहकार तत्त्वाने पुन्हा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्यास नवा आयाम देत आहे. त्याची आदर्श उदाहरणे पुढे येत आहे. हे चित्र आशादायी आहे. शेतकऱ्यांनी याची आवश्यक माहिती व लाभ समजून घेत ते इतर शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे. कामकाजात पारदर्शकता महत्त्वाची आहे.
पाचपोर म्हणाले, की शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या, यामध्ये भविष्य नाही. आता व्यावसायिक दृष्टीने काम करण्याची गरज आहे. कृषी व्यवसायाच्या नावीन्यपूर्ण संकल्पना या अंगिकाराव्यात व शेती समूहाच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
‘शेती प्रगतीचा संकल्प करा’
संघटितपणे एकत्र येत शेतकऱ्यांनी किमया घडविली. मात्र देशात सहकारातून काहींनी स्वाहाकार केला. सामाजिक उद्धाराच्या नावाखाली स्वतःचा उद्धार केला. त्यामुळे सहकार बदनाम झाला. पुन्हा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीचे सध्याचे चित्र बदलण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे. यासाठी सहकारात संस्कारांची गरज आहे. सहकाराच्या संस्काराहून शेती प्रगतीचा संकल्प करा, असे आवाहन बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.