Washim News : आत्माचे प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांनी वाशीम कृषी विज्ञान केंद्राच्या विदाता प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती अनिशा महाबळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे, प्रकल्प उपसंचालक एस. के. वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी संजय चतरमल व विदाताचे नोडल अधिकारी डॉ. एस. के. देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. तांभाळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची जिल्ह्यातील प्रगती व राबवित असलेल्या उपक्रमांचा सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. याप्रसंगी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानातून रासायनिक खतांचा वापर २५ टक्के कमी करून शेतकरी, बचत गट व एफपीओ स्तरावर जैविक निविष्ठा उत्पादन व वापर वाढण्याची सूचना केली.
जमिनीचे भौतिक व जैविक गुणधर्म सुधारण्याकरिता सेंद्रिय निविष्ठाचा वापर वाढवून शाश्वत व पोषक अन्नधान्य उत्पादनाकरिता संपूर्ण देशभर चळवळ राबविणार आहोत, असेही सांगितले.
राज्य, जिल्हा, तालुका तसेच ग्रामस्तरावर कार्यरत कर्मचारी, अधिकारी व शास्त्रज्ञांची नैसर्गिक शेती पद्धतीबाबत तांत्रिक प्रशिक्षणातून क्षमता बांधणी व प्रकल्प अंमलबजावणीसाठी कृषी आयुक्तालय, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करून स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
तसेच या योजनेत स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी गट प्रर्वतकांचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्रामार्फत घेण्यात येईल व आवश्यक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक उभे करण्याकरिता त्यांच्या प्रक्षेत्रावर शेतावरील जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणार असल्याचे सांगितले.
या वेळी आरीफ शहा, अनिसा महाबळे, डॉ. काळे व संजय चतरमल यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक, पोकरा प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.