Turmeric Cultivation In Washim : यंदाच्या हंगामात तालुक्यात हळद लागवडीला सुरुवात झाली आहे. मॉन्सूनचे आगमन वेळेवर होईल, अशा प्रकारचा हवामान खात्याचा अंदाज पाहता रखरखत्या उन्हातही ही कामे सुरू झालेली आहेत.
तालुक्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळे मागील काही वर्षापासून शेतकरी हळद या नगदी पिकाकडे वळतो आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते.
हळद हे हमखास उत्पादन देणारे नगदी पीक असल्यामुळे तसेच या पिकाला इतर पिकांच्या प्रमाणात जंगली प्राणी व किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कल वाढत आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असलेले बहुतांश शेतकरी एक ते दोन एकर किंवा त्याहीपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड करीत आहेत.
मागील काही वर्षांपासून हळद या पिकाच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून दाखल होणार आहे.
त्यामुळे तळपत्या उन्हाची पर्वा न करता शेतकरी हळद लागवड व इतर पेरणीपूर्व कामे करीत आहे. तालुक्यातील शेतकरी हळद लागवड करीत असून या कामाने वेग घेतला.बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने हळद लागवड करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.