Custard Apple Processing : सीताफळापासून गर, पावडर निर्मिती

Custard Apple Foods : सीताफळ हे पौष्टिक फळ आहे. सीताफळाची प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात.
Custard Apple Processing
Custard Apple ProcessingAgrowon
Published on
Updated on

अमृता दंडवते, डॉ. भरत आगरकर

Food Processing : सीताफळ हे पौष्टिक फळ आहे. सीताफळाची प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करता येतात. या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात. फळातील जीवनसत्त्व क हे प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जे दीर्घकालीन आजारापासून दूर ठेवते. या फळात कमी फॅट आणि कोलेस्टेरॉल असते, जे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये पोटॅशिअम सारखे खनिज हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे अत्यंत पौष्टिक फळ आहे, ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. याचे नियमित सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यात मदत होते.

सीताफळ थंड वातावरणात साठवून ठेवल्यास गुणवत्तेचे नुकसान होते. गर अतिशय नाजूक असतो आणि जर तो उघड्यावर ठेवला तर एका तासाच्या आत रंगबदल आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. सीताफळाचा गर गोठवून साठवल्यास कोणत्याही गुणवत्तेच्या हानीशिवाय टिकतो. या गरापासून तयार पेय, जॅम, जेली, फळ मिक्स, स्प्रे-ड्राईड पावडर तयार करता येते.

सीताफळाची विशिष्ट हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्धता होते. फळाची अल्प साठवण क्षमता आणि गर, बिया वेगळे करण्यातील अडचणींमुळे हे फळ प्रक्रियेसाठी कमी प्रमाणात वापरले जाते. संशोधनानुसार अस्कॉर्बिक ॲसिड आणि केएमएस वापरून -१८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात साठवण केल्यास गराची साठवण क्षमता ९० दिवसांपर्यंत वाढवता येते.

Custard Apple Processing
Custard Apple Farming : श्रावणात बाजारपेठेत सीताफळ खातेय भाव

गर निर्मिती

फळातील गर काढण्यासाठी यंत्र उपलब्ध आहे. याची कमाल क्षमता ३६.०८ किलो प्रति तास आहे.

प्रथम पिकलेले सीताफळ पाण्याने स्वच्छ धुवावे. फळाचे हाताने दोन भाग करावेत आणि बियांसह लगदा चमच्याने काढून टाकावा. बिया आणि लगदा ब्रश प्रकारच्या पल्परच्या मदतीने वेगळा करावा.

स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात एक किलो गर घेऊन त्यामध्ये ०.५ ग्रॅम अस्कॉर्बिक ॲसिड आणि ०.७ ग्रॅम पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट मिसळले आणि ते उणे २० अंश सेल्सिअस तापमानात गोठवले तर गर एक वर्षापर्यंत साठवू शकता.

Custard Apple Processing
Custard Apple Farming : बहर धरताना सीताफळ बागेची अशी छाटणी करा

पावडर

एक किलो गरामध्ये ०.५ ग्रॅम अस्कॉर्बिक ॲसिड आणि ०.७ ग्रॅम केएमएस आणि ०.२५ ग्रॅम माल्टोडेक्सट्रिन मिसळावे. ५ ते ८ टक्के पाण्याचे प्रमाण ठेऊन स्प्रे ड्रायरमध्ये वाळवावे.

तयार पावडर व्हॅक्युम सीलबंद पॉलिथिन पिशवीत पॅक करून थंड व कोरड्या जागी ठेवावी.आइस्क्रीम, श्रीखंड मिल्कशेक तयार करण्यासाठी या पावडरीचा वापर करतात.

जॅम

एक किलो गरात ७०० ते ७५० ग्रॅम साखर आणि ८ ते १० ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून पूर्णपणे विरघळावे. मिश्रण गरम करावे. गरम करताना मिश्रण सतत ढवळावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे. यावेळी मिश्रणाचा टीएसएस ६८ टक्के असावा.

तयार केलेला जॅम निर्जन्तुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटलीमध्ये भरावा. बाटल्या थंड कराव्यात, त्यावर अल्युमिनिअम फॉइलचा एक थर लावून झाकण बसवावे. बाटल्या थंड जागी ठेवाव्यात.

अमृता दंडवते, ७४४७२९९३२२

(अन्न अभियांत्रिकी विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय,परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com