Petha Production : कोहळ्यापासून पेठा निर्मिती

Kohla Cultivation : भारतात पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत कोहळ्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते.
Petha and Kohla
Petha and KohlaAgrowon
Published on
Updated on

Petha : भारतात पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत कोहळ्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते. फळे लंबगोल व रसाळ असून पूर्ण पिकल्यावर पांढऱ्या मेणचट थराने आच्छादलेली दिसतात.फळ गोड, शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल व वाजीकर असते. दमा, खोकला, मधुमेह इत्यादी विकारांवर गुणकारी असते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बिया गोड, शीतल आहेत. कोरडा खोकला, ताप, उपदंश इत्यादींवर गुणकारी असतात. बियांचे तेल कृमिनाशक असते.

Petha and Kohla
Sea Foods : समुद्री अन्नाची अनोखी दुनिया

कोहळ्यांचा गर भाजी, सांडगे व पापड इत्यादींसाठी उपयोगात आहे. उत्तर भारतात कोहळ्यापासून पेठा मिठाई करतात. दक्षिण भारतात कोहळा आमटीत मिसळतात. कोहळ्यापासून महाराष्ट्रात कोहळेपाक बनवितात. कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात. कोहळ्याचे बी लागवडीसाठी हवे तेव्हा उपलब्ध व्हावे यासाठी व इतर अनेक कारणांसाठी घरात कोहळा टांगून ठेवतात.

Petha and Kohla
Food Inflation : खरीप हंगामावर महागाईचे सावट

पेठा निर्मिती

सर्व प्रथम कोहळा मधून चिरून घ्यावा. नंतर त्याच्या आतील बिया आणि मऊ भाग वेगळा करावा. उरलेल्या कोहळ्याच्या चौकोनी वड्या कराव्यात. त्याआधी कोहळ्याची साले काढून घ्यावीत.

एका मोठा वाडगा भरून पाणी घेऊन त्यात दोनदा चुन्याच्या निवळी घालावी. पाणी चांगले ढवळून घेतल्यानंतर चिरलेल्या कोहळ्याचे तुकडे घालावेत.

बारा तासांसाठी कोहळा चुन्याच्या पाण्यात भिजवत ठेवावा. बारा तासांनी हे पाणी फेकून द्यावे. स्वच्छ पाण्याने कोहळ्याचे तुकडे धुऊन घ्यावेत. धुतलेल्या तुकड्यामध्ये छिद्र पाडून घ्यावीत. त्यानंतर उकळत्या पाण्यात कोहळ्याचे तुकडे टाकावेत आणि २० मिनिटे त्याला शिजू द्यावे. कोहळा कोवळा असेल तर लवकर शिजतो.

कोहळ्याचे तुकडे पारदर्शी होईपर्यंत कोहळा शिजवावा. २० ते २५ मिनिटांनी शिजवलेला कोहळा निथळून घ्यावा. यावर गार पाणी ओतून तो किती पारदर्शी झाला आहे ते तपासावे. यानंतर एक किलो कोहळ्याच्या तुकड्यात ६०० ग्रॅम साखर मिसळून त्यात पाणी मिसळावे. त्याचा एक तारी पाक बनवून घ्यावा. त्यानंतर कोहळ्याचे तुकडे साखरेच्या पाकात

शिजवत ठेवावेत. शिजवताना ढवळून घ्यावे. पाक घट्ट होत आला की, गॅस बंद करावा. एका स्टीलच्या परातीवर फुलपात्र उलटे करून

ठेवा आणि त्यावर एक जाळी ठेवावी. जाळीवर एक एक पेठा असा सुकवायला ठेवावा. किमान ७ ते ८ तास पंख्याखाली पेठा सुकू द्यावा.

अशा प्रकारे स्वादिष्ट कोहळ्यापासून पेठा तयार होतो.

कृष्णा काळे, ८८०५९६८५३६

(अन्नप्रक्रिया तज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com