Sugar production : मराठवाड्यात १ कोटी ७२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

मराठवाड्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी ६१ कारखान्यांमध्ये ३५ खासगी व २६ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
Sugar production
Sugar productionAgrowon
Published on
Updated on

Aurangabad News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या गाळप (Crushing) हंगामात १३ फेब्रुवारीपर्यंत ६१ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या कारखान्यांनी १ कोटी ८४ लाख ४६ हजार ५९३ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) करत १ कोटी ७२ लाख ९६ हजार ७६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

मराठवाड्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी ६१ कारखान्यांमध्ये ३५ खासगी व २६ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

त्यामध्ये सर्वाधिक १३ कारखाने उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू असून, त्या पाठोपाठ ११ कारखाने लातूर जिल्ह्यात, औरंगाबाद व परभणी जिल्ह्यांत प्रत्येकी ७, बीड जिल्ह्यात ८, नांदेड जिल्ह्यात ६, हिंगोली जिल्ह्यात पाच व जालना जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे.

Sugar production
Sugar Factory Election : गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत शिवशाही पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांपैकी हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांतील कारखान्यांचा उतारा हा दहा टक्क्यांपुढे राहिला आहे. तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा उतारा सर्वांत कमी ७.५९ टक्केच राहिला असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

गाळप गतीने सुरू असले तरी यंदा पुन्हा एकदा प्रश्‍न डोके वर काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा - कारखाने - ऊसगाळप (टन) - साखर उत्पादन (क्विंटल) - उतारा स्थिती (टक्के)

उस्मानाबाद- १३ ४१२६४०४ ३६६५००५ ८.८८

औरंगाबाद - ७ १५८८५६८ १६४३४६५ १०.३५

जालना - ४ १६३६०७७ १६३८९४० १०.०२

बीड - ८ २९७६०१९ २२५९०७५ ७.५९

परभणी - ७ २२१२७१७ २१७१७४५ ९.८१

हिंगोली - ५ १२९६९१४ १३५९०३० १०.४८

नांदेड- ६ १५१८०१५ १५०९२६० ९.९४

लातूर - ११ ३०९१८८१ ३०५०२४० ९.८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com