

Palghar News : पारंपरिक भातशेती न करता डहाणूतील वेती येथील शेतकऱ्यांनी विविध प्रयोग करीत मागील वर्षी ऑरगॅनिक स्ट्रॉबेरीचे पीक घेतले होते. या वर्षी वेती वरोती ग्रुप ग्रामपंचायतीतील सहा शेतकऱ्यांनी प्रत्येकी चार ते पाच गुंठ्यामध्ये मसूर लागवडीचा निर्णय घेतला आहे. यासाठी रासायनिक खत न वापरता शेणखत वापरणार आहेत. तसेच सेंद्रिय खताचा वापर करत भाजीपाला लागवड करत आहेत.
कोरोना काळात दोन वर्षे या गावातील शेतकरी एकत्र येत विविध भाजीपाला लागवड करीत त्यातून उत्पन्न मिळवत होते. आपल्या गरजा भागवल्याने कोठेच जाणे होत नव्हते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मिळकत नव्हती. प्रयोगशील शेतकरी कैलास बसवत हे नेहमी गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करीत विविध प्रयोग करतात. यावर्षी मसूर, मशरूम लागवड करण्याचे ठरवले आहे.
मसूर फक्त थंड वातावरणात होते. डहाणू तालुक्यात थंड वातावरण आहे. मसूरची लागवड हिवाळ्यात केली जाते. सध्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मसूरच्या बियाण्याची १०० टक्के अनुदानाने वाटप झाले असून आठ ते दहा शेतकऱ्यांनी मसूर लागवड करण्याचे ठरवले आहे.
मसूरला हलक्या सूर्यप्रकाशाची गरज असते. बियांमध्ये रोपांमध्ये एक ते दोन इंच अंतर ठेवले जाणार आहे. मसूरमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने शाकाहारी लोकांना त्याचा खूप फायदा होतो. त्यात फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचनसंस्थेला निरोगी ठेवते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते, रक्तदाबदेखील नियंत्रित करते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.