Turmeric Processing Products : हळद प्रक्रियेतून निर्यातक्षम उत्पादनांची निर्मिती करा

IAS Jitendra Papalkar : हिंगोली जिल्ह्यात ‘एक जिल्हा एक उत्पादन’मध्ये हळदीचा समावेश आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिकाधिक हळद प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.
IAS Jitendra Papalkar
IAS Jitendra PapalkarAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात ‘एक जिल्हा एक उत्पादन’मध्ये हळदीचा समावेश आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिकाधिक हळद प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. निर्यातक्षम उत्पादने तयार करावीत. निर्यातवृद्धी झाली तर हिंगोली जिल्हा हळद एक्स्पोर्ट हब म्हणून विकसित होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रासंदर्भात राज्य व केंद्र शासनाची धोरणे, उपक्रम याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी इग्नाईट महाराष्ट्र २०२४ अंतर्गत जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता. २३) आयोजित एकदिवसीय जिल्हा स्तरीय कार्यशाळेत पापळकर बोलत होते.

IAS Jitendra Papalkar
Turmeric Crop Management : हळद पिकाचे खत, सिंचन व्यवस्थापन

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयाचे अमोल मोहिते, नांदेड उपविभागीय कार्यालयाचे अमोल इंगळे, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे, निर्यात सल्लागार अमोल मोहिते, सीडबीच्या सहायक व्यवस्थापक क्षितिजा बलखंडे, टपाल कार्यालयाचे निरीक्षक संदीप लोखंडे, न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे अनिल जाधव, डीजीएफटी नागपूरचे ध्रुव पारेख, उद्योग निरीक्षक आर. एल. आहेर, आपेडा पुणे, सीडबी, आय. डी. बी. आय. कॅपिटल यांच्या सहकार्याने निर्यातदार उद्योजक, औद्योगिक समूह, बँकर्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

IAS Jitendra Papalkar
Yeola APMC Election : येवला बाजार समिती सभापतिपदी पवार बिनविरोध

हजारे यांनी शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणारे परवाने, अंमलात आलेले नवीन कायदे यावर माहिती दिली. पारेख यांनी आयात-निर्यात प्रक्रियाबाबत यावर तर बलखंडे यांनी सीडबीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या वित्त पुरवठ्याबाबत माहिती दिली. मोहिते यांनी जिल्ह्याचा निर्यात कृती आराखडा सादर केला. मिटकॉन हिंगोलीचे प्रकल्प अधिकारी सुभाष जाधव, खादी व ग्रामोद्योग अधिकारी भोसीकर, जिल्हा उद्योग केंद्राचे पी. व्ही. मेंढे, उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, उद्योग निरीक्षक वर्षा बोरकर, महाराष्ट्र उघोजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी सहकार्य केले.

कार्यशाळेस निर्यातदार औद्योगिक संघटनेचे ज्ञानेश्‍वर मामडे, प्रवीण सोनी, नंदकिशोर तोष्णीवाल, औद्योगिक समुहाचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी, व उद्योजक, निर्यातदार उद्योजक, जिल्ह्यातील औद्योगिक समूहाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com