Ahilyanagar News: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व ‘नाफेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम (२०२५-२६) मध्ये शासनाने निश्चित केलेल्या हमीभावानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे..अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत चार ठिकाणी खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. जवळपास ८०० शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडदाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यंदा राज्य सहकारी पणन महासंघाच्या (एनसीसीएफ) वतीने नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, हिंगोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांमध्ये खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे..Soybean Market: बियाण्याचे सोयाबीन खातेय चांगलाच भाव.हमीभावानुसार ८ हजार ७६८ रुपये प्रति क्विंटल, उडदाची ७ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल, सोयाबीनची ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील ‘नाफेड’ किंवा ‘एनसीसीएफ’च्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी. नोंदणी ही ऑनलाइन पद्धतीने पीओएस मशीनद्वारे करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा सातबारा उतारा, पीकपेरा आदी कागदपत्रांसह प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. .आतापर्यंत सोयाबीनची सहाशे, मुगाची एका शेतकऱ्याने तर उडीद विक्रीसाठी २५९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. एसएमएस प्राप्त झाल्यानंतरच शेतीमाल विक्रीकरिता खरेदी केंद्रावर आणावा लागणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत खर्डा (ता. जामखेड), मांडवगण (ता. श्रीगोंदा), पाथर्डी व राहुरी अशा चार ठिकाणी खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. .सोयाबीन, उडीद, मुगाची हमीभावानुसार खरेदीला शनिवार (ता. १५) पासून सुरुवात होत आहे. शेतकरी नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सुविधा देण्यासाठी प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मुगाच्या विक्रीसाठी नोंदणीत सहभाग घ्यावा.- भारत पाटील, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.