Parbhani News : यावर्षीच्या (२०२२-२३) हंगामात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गंत हमीभावाने (प्रतिक्विंटल ५३३५ रुपये) हरभरा खरेदीसाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) ने मंजुरी दिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केंटींग फेडरेशन) अंतर्गंत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात १५ आणि केंद्रावर सोमवार (ता. २०) पर्यंत २३ हजार ४६३ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
या दोन जिल्ह्यातील ८ केंद्रावर रविवार (ता. १९) पर्यंत १८३ शेतकऱ्यांचा ३ हजार २६८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
राज्य सहकारी पणन महासंघ अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ८ केंद्रांवर १३ हजार ६२९ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केली. एकूण ६४५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले.
रविवार (ता. १९) पर्यंत परभणी, बोरी, सेलू, पूर्णा या ४ केंदावर ९३ शेतकऱ्यांकडून १ हजार ८३७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कनेरगाव, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ), सेनगाव, साखरा या ७ केंद्रांवर ९ हजार ८३४ शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यापैकी २८३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले.
रविवार (ता. १९) पर्यंत कनेरगाव, कळमनुरी, जवळा बाजार, सेनगाव या ४ केंद्रांवर ९० शेतकऱ्यांकडून १ हजार ४३१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला, असे शेवाळे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.